अहमदनगर : जेईईचा फॉर्म न भरल्याने वडील रागावले म्हणून बारावीत शिकणा-या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (दि. ३) रात्री साडेआठ वाजता प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात ही घटना घडली.सत्यम विजय माळी (वय १७, रा. मयूर कॉम्प्लेक्स, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी, नगर) हे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सत्यम हा शहरातील सारडा महाविद्यालयात बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होता. बुधवारी जेईईचा आॅनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत होती. सत्यमने फॉर्म न भरल्याने त्याच्यावर वडील रागावले. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून सत्यम याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडील रागावल्याने बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 10:48 IST