शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

पेडगाव बसस्थानकावरच ऊस तोडणी मजूर महिलेची प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:29 IST

जागतिक महिला दिनाची तयारी जोरात चालू असताना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानकावर एका उस तोडणी मजूर महिलेने शनिवारी(दि.७) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका बाळाला जन्म दिला. वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाली नसतानाही आईसह बाळ सुखरुप आहे. 

श्रीगोंदा : जागतिक महिला दिनाची तयारी जोरात चालू असताना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानकावर एका उस तोडणी मजूर महिलेने शनिवारी(दि.७) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका बाळाला जन्म दिला. वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाली नसतानाही आईसह बाळ सुखरुप आहे.  नाशिक जिल्ह्यातील नांदगाव केरू पोकळे हे व त्यांची पत्नी सलाबाई हे दोन लेकरांसह दौड शुगर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आले होते. सलाबाई या गरोदर होत्या. अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी त्या पतीबरोबर ऊस तोडत होत्या. पोटात दुखू लागल्याने श्रीगोंद्यात बसने जाण्यासाठी निघाल्या असताना पेडगाव बसस्थानकावर त्यांची प्रसुती झाली. शासन महिलांना गरोदरपणाची सहा महिन्याची रजा देते. त्यांना त्या काळात पगार देते. मात्र आजही गरीब कुटुंबातील महिलांना गरोदरपणाच्या काळात ना सकस आहार, ना रजा.. अशी अवस्था आहे. ऊस तोडणी मजुरांची महिला रस्यावर प्रसूती होते. तिला कसल्याही आरोग्य सुविधा मिळाल्या नाहीत. मग कशासाठी जागतिक महिला दिन साजरा करायचा? हा खरा प्रश्न आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाWomenमहिला