शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

परवान्याविना ऊस गाळप सुरू : केदारेश्वर, तनपुरेसह ५ कारखाने

By मिलिंदकुमार साळवे | Updated: November 17, 2018 10:37 IST

राज्यातील साखर कारखानदारीचा यंदाचा हंगाम सुरू झाला असला तरी साखर आयुक्त कार्यालयाकडे कारखान्यांचे गाळप परवाने रखडले आहेत.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यातील साखर कारखानदारीचा यंदाचा हंगाम सुरू झाला असला तरी साखर आयुक्त कार्यालयाकडे कारखान्यांचे गाळप परवाने रखडले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी आयुक्त कार्यालयाकडून परवाना मिळण्याची वाट न पाहताच परवान्याविना आपला ऊस गळीत हंगाम सुरू केला आहे.अहमदनगर जिल्ह्यात खासगी व सहकारी असे एकूण २२ साखर कारखाने आहेत. यावर्षी राज्यात जास्त ऊस असल्यामुळे एक महिनाअगोदरच कारखाने सुरू करण्याचा निर्णय साखर आयुक्तालयाने घेतला होता. त्यानुसार दसऱ्यापूर्वीच कारखान्यांचा बॉयलर पेटला. तर दिवाळीच्या सुमारास कारखान्यांच्या प्रत्यक्ष ऊस गाळपास सुरूवात झाली. हंगाम सुरू करण्यासाठी आयुक्तालयाने कारखान्यांना गाळप परवाने मिळविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन प्रस्ताव मागविले होते. त्याप्रमाणे कारखान्यांनी आयुक्तालयाकडे प्रस्ताव सादर केले. त्यानुसार गाळप परवाना मिळालेल्या कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन ऊस गाळप सुरू होऊन साखर उत्पादनास देखील सुरूवात झाली आहे. मात्र काही कारखान्यांनी साखर आयुक्तालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवित नियमांचे उल्लंघन करीत बिनदिक्कतपणे ऊस गाळप सुरू केले आहे.राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्यास साखर आयुक्तालयाकडून परवाना मिळालेला नाही. पण या कारखान्याने ऊस गाळप करून साखर निर्मितीही सुरू केली आहे. उत्पादित केलेल्या साखर पोत्यांचे पूजनदेखील करण्यात आले आहे.गाळप परवाना न मिळालेले कारखानेसाखर आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील युटेक, श्रीराम, साईकृपा-२(हिरडगाव) या ३ खासगी कारखान्यांसह तनपुरे, केदारेश्वर व नागवडे या ३ सहकारी साखर कारखान्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत गाळप परवाना मिळालेला नव्हता. यातील जय श्रीराम, तनपुरे, केदारेश्वर व नागवडे या चार कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यातील तनपुरे व केदारेश्वर कारखान्याकडे शेतकºयांची एफ. आर. पी. ची रक्कम थकलेली आहे.गाळप परवाना मिळविण्यासाठी या कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. परवाना प्राप्त नसताना गाळप करणा-या कारखान्यांना असे गाळप सुरू केल्यापासून प्रति मेट्रिक टन १ हजार रूपये दंड करण्याची तरतूद आहे. - संगीता डोंगरे, साखर सहसंचालक, अहमदनगर.कारखान्यास गाळप परवाना मिळालेला नाही. काही बाबींची पूर्तता करायची राहिली होती. पूर्तता होताच परवाना मिळेल. - टी. आर. ढोणे, कार्यकारी संचालक, तनपुरे सहकारी साखर कारखाना,राहुरी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर