शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

साखर विक्रीची चौकशी करणार- सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 20:23 IST

शिर्डी : यंदा साखरेचे उत्पादन पुरेसे आहे. काही कारखानदार व दलाल साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याने तात्पुरते भाव ...

शिर्डी: यंदा साखरेचे उत्पादन पुरेसे आहे. काही कारखानदार व दलाल साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याने तात्पुरते भाव पडले आहेत. आठ पंधरा दिवस कारखानदारांनी साखर विक्री बंद करावी, असा सल्ला सोमवारी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. तसेच या काळातील साखर विक्रीची चौकशी करण्यात येईल, असे सांगत कारखान्यांनी एफआरपी दिला नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.शिर्डीच्या सरकारी विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. या सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर आपण पूर्ण समाधानी आहात का? याचे उत्तर देताना खोत यांना बरीच कसरत करावी लागली. थेट उत्तर देण्याऐवजी गेल्या पंधरा वर्षाच्या तुलनेत या सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले़ यासाठी अनेक दाखले देतानाच हे सरकार शेतकºयांचेच आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी डॉ़ राजेंद्र पिपाडा, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती दीपक पटारे आदींसह शेतकरी नेत्यांची उपस्थिती होती़शेतकरी कर्जमाफीबाबत बोलतांना खोत यांनी आमचे लबाडाचे आवतनं नाही, आम्ही जेवणच दिल़े पंधरा वर्षे तुमचे सरकार असताना का कर्जमाफी का देऊ शकला नाही?, पंधरा वर्षे ज्यांनी डल्ला मारला ते आता हल्लाबोलच्या माध्यमातून कोल्हेकुई करीत आहेत, या शब्दात त्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या आरोपांचा व विरोधकांच्या हल्लाबोल आंदोलनाचा समाचार घेतला़ निवडणुकीच्या तोंडावर वीज देण्याचे आश्वासन देऊन निवडणुकीनंतर बिले वसूल केल्याची आठवणही खोत यांनी करून दिली़ २००८ च्या कर्जमाफीच्या तुलनेत चारपट अधिक कर्जमाफी दिल्याचा दावाही त्यांनी केला़दिवंगत यशवंतराव, वसंतदादा यांच्या नंतर शेतकºयांचा कळवळा असलेला मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करीत फडणवीसांनी देशमुख, पवारांची मक्तेदारी मोडीत काढली म्हणून मगरीचे अश्रू सुरू आहेत़ पण फडणवीस आपला कार्यकाल पूर्ण करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन निवडणूक जिंकू, असा विश्वास कृषी राज्यमंत्री खोत यांनी शिर्डीत व्यक्त केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSadabhau Khotसदाभाउ खोत shirdiशिर्डी