शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उसाची पळवापळवी; प्रवरा व संगमनेरला ऊस न देण्याचे भानुदास मुरकुटेंचे आवाहन

By शिवाजी पवार | Updated: January 29, 2024 14:27 IST

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शेतकरी व सभासदांना श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु वाचविण्याची मागणी केली आहे.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांना उसाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे येथील अशोक साखर कारखान्याच्या कार्यक्षत्रातील उसाची संगमनेर आणि प्रवरा साखर कारखान्यांनी तोडणी सुरू केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शेतकरी व सभासदांना श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु वाचविण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुरकुटे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे. श्रीरामपूर तालुक्याचे हक्काचे पाणी पळविणाऱ्या आणि या भागाचे वाळवंट करण्यासाठी टपलेल्या या नेत्यांच्या कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये.

महसूलमंत्री विखे पाटील व माजी मंत्री थोरात यांचे श्रीरामपूर तालुक्याच्या ऊस उपलब्धता वाढीसाठी कोणतेही योगदान नाही. त्यामुळे ‘अशोक’च्या सभासद शेतकऱ्यांनी प्रवरा व संगमनेर कारखान्यास ऊस न देता आपल्या भागाची कामधेनु असणाऱ्या अशोक कारखान्यासच ऊस पुरवावा, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे.

मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विखे व थोरातांनी आपल्या भागाचे पाणी पळविले. मी आमदार असताना विखेंनी प्रवरा परिसरात डाव्या कालव्यावर आडवे बांध घातले होते. ते मी सुरुंग लावून उद्ध्वस्त केले. प्रवरा डावा कालव्याचे नूतनीकरण करून वहन क्षमतेत दीडपट वाढ केली. हजारो एकराचे रद्द झालेल्या ब्लॉकचे फेरवाटप करून आपल्या भागाचे पाटपाणी संरक्षित केले. अशोक कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रतील ओढ्या-नाल्यांवर बंधाऱ्यांची मालिका उभारून पाणी उपलब्धता वाढविली. या सर्वांमुळे कार्यक्षेत्रातील उसाच्या उपलब्धतेत ३६ हजार टनवरून बारा लाख टनपर्यंत वाढ झाली. या उसावर प्रवरा व संगमनेर कारखान्याचा डोळा आहे. दोघेही नेते सत्तेच्या जोरावर आपल्या भागावर सतत अन्याय करतात, असा आरोप मुरकुटे यांनी केला. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने