शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

अशी आहे.. नायजेरियन गुन्हेगारांची मोडस  ऑपरेंडी: मैत्री, पे्रम, गिफ्टचा मोह अन् फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:51 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन मैत्री करून आधी प्रेमाचे जाळे आणि नंतर महागड्या गिफ्टच्या मोहात पाडून नायजेरियन गुन्हेगारांनी महाराष्ट्रासह देशभरातील हजारो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे धक्कादायक वास्तव सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

अरुण वाघमोडे ।अहमदनगर: सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन मैत्री करून आधी प्रेमाचे जाळे आणि नंतर महागड्या गिफ्टच्या मोहात पाडून नायजेरियन गुन्हेगारांनी महाराष्ट्रासह देशभरातील हजारो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे धक्कादायक वास्तव सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. मोठे व्यावसायिक, महिला, तरुण, तरुणी व काही ज्येष्ठ व्यक्तीही नायजेरियन गुन्हेगारांचे शिकार ठरले आहेत़. नगरच्या सायबर पोलिसांनी नुकतेच राजस्थान पोलिसांकडून एरगुन फ्रॅण्क आणि मोनिका गॉडविन या आरोपींना ताब्यात घेतले. यातील फ्रॅण्क हा नायजेरियन आहे तर मोनिका ही नोयडाची़ या दोघांसह त्यांच्या साथीदारांनी नगर जिल्ह्यातील एका तरुणीला ऑनलाइन ४५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तर राजस्थान येथील एका महिला काँग्रेस नेत्याचीही तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे. वर्षभरापूर्वी याच पद्धतीने एका नायजेरियन टोळीने श्रीरामपूर येथील एका व्यावसायिकाला एक कोटी रुपयाचा गंडा घालता होता. ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करणा-या नायजेरियन गुन्हेगारांचे मोठे रॅकेट दिल्ली व ग्रेटर नोयडा (उत्तरप्रदेश) परिसरात आहे. येथूनच ते ऑनलाइन पद्धतीने देशभरात फसवणूक करतात.  नगर व राजस्थान येथील फसवणुकीत पैसे हस्तांतरित करण्यासाठी ज्या बँक खात्याचा वापर झाला ते खाते सायबर पोलिसांनी बंद केले आहे़. या खात्यावर तब्बल साडेसहा कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियासह, शादी डॉट कॉम, जॉब सर्च वेबसाईट, बँका यासह विविध माध्यमातून हे नायजेरियन गुन्हेगार अनेकांचा डेटा मिळवितात. त्यानंतर सदर व्यक्तींशी संपर्क करतात. त्यानंतर पुढील फसवणुकीची प्रक्रिया सुरू होते. अशी आहे मोडस ऑपरेंडीज्याची फसवणूक करावयाची आहे ती व्यक्ती महिला असेल तर तिच्याशी पुरुष गुन्हेगार संपर्क करतो़. परदेशात सरकारी सेवेत मोठ्या हुद्यावर अथवा एखाद्या कंपनीचा सीईओ असल्याचे भासविले जाते. आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क केला जातो़. मैत्री झाल्यानंतर  फोन करूनही संवाद साधला जातो़. या संवादासाठी भारतीय तरुण-तरुणींचा वापर केला जातो़. कधी या मैत्रीतून महिला अथवा तरुणी त्या गुन्हेगाराच्या प्रेमातही पडते. त्यानंतर तुमच्यासाठी परदेशातून लाखो रुपयांचे सोन्याचे अथवा हि-यांचे गिफ्ट पाठविले आहे़ असे सांगितले जाते. गिफ्टचा मेसेज आल्यानंतर दोन दिवसांनी दिल्ली विमानतळावर कस्टम अधिका-याचा फोन येतो़. अर्थात याच टोळीकडून हा फोन केला जातो़. गिफ्ट घेण्यासाठी कस्टम ड्युटी म्हणून ५० हजार ते ५ लाख रुपये ऑनलाइन मागितले जातात़. गिफ्टच्या मोहापायी अनेकांनी असे पैसे भरून स्वत:ची फसवणूक करून घेतली आहे. याच पद्धतीने महिलांसह पुरुषांचीही फसवणूक केली जाते.नायजेरियन गुन्हेगार असे येतात भारतात दिल्ली आणि गे्रटर नोयडा परिसरात पंधरा ते वीस हजार नायजेरियन नागरिक राहतात़. पर्यटन, एज्युकेशन, व्यवसाय अथवा मेडिकल व्हिसावर हे नागरिक भारतात आलेले आहेत. यातील बहुतांशी जण ऑनलाइन फसवणुकीच्या रॅकेटमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्यासोबत अनेक भारतीय तरुण-तरुणीही या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. अनेक नायजेरियन तरुणांच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. त्यांच्याकडे मात्र प्रशासनाकडून चौकशी होत नाही़. त्यामुळे भारतात राहून ते गुन्हेगारी कृत्य करतात. ...अशी घ्यावी दक्षता सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी फ्रे ण्डरिक्वेस्ट स्वीकारू नये. अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.फेसबुक व अथवा इतर ऑनलाइन साईटवर आपली वैयक्तिक माहिती अथवा संपत्तीचे प्रदर्शन करू नये. बँकेचे खाते, एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ओटीपीची माहिती देऊ नये. ऑनलाइन बक्षीस, केबीसी, लॉटरी असे आमिष आले तर त्याला बळी पडू नये.

आधुनिक तंत्रज्ञान वापरताना दक्षता न घेतल्याने बहुतांशवेळा ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार घडतात. ऑनलाइन बँकिंग, फेसबुक, इंस्टाग्राम यासह इतर ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन्स वापराचे ज्ञान पूर्णपणे आत्मसात करूनच त्याचा वापर करावा. इंटरनेटच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात राहू नये़ अथवा आपली माहिती कुणाला देऊ नये़ अशा स्वरुपाच्या दक्षता घेतल्या तर आपली फसवणूक टळते़. -अरुण परदेशी, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन,अहमदनगर.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी