शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

छप्परात राहाणा-या निताने मिळवले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 15:49 IST

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थीनी निता जठार हिने परिस्थितीवर मात करत दहावीत यश मिळविले.

नानासाहेब जठारविसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थीनी निता जठार हिने परिस्थितीवर मात करत दहावीत यश मिळविले. मोलमजुरी करुन छप्परात राहाणा-यांची मुलगी निता पोपट जठार वेळ मिळेल, तेव्हा अभ्यास करून दहावीत ९० टक्के गुण मिळवून कष्टमय असे यश प्राप्त केले आहे.   निताच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. आई व वडील दोघेही मोलमजुरी करुन कुटुंबाची उपजीविका करतात. पती-पत्त्नी, एक मुलगा व नितासह दोन मुली असा हा पोपट जठार यांचा परीवार, पण त्यांना राहायला व्यवस्थित घर नाही. दगड मातीच्या भिंती व गवताचे छत. मागील वर्षी त्यांच्या घराचे छत वादळात उडून गेले होते. अशाही परिस्थितीत तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले. आई अडाणी व वडील सहावी शिकलेले. ना घरात शैक्षणिक वातावरण, ना कोणतेही खाजगी क्लास लावण्याची ऐपत, ना पुरेशे शालेय साहीत्य उपलब्ध. केवळ शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शनाखाली तिने अभ्यास केला. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत निताने मिळवलेले या यशामुळे भाऊ प्रशांत याने कष्टकरुन तिला पुढील शिक्षणाला साथ देण्याचे ठरवले आहे. प्रशांत दहावी शिकून मिळेल तो कामधंदा करत आहे. शासनाचे अटीत बसत नसल्याने मजुरी करून जिवन जगणा-या व छप्परात रहाणा-या या कुटुंबाला अद्याप घर मिळाले नाही. अशाही परिस्थिती निताला शिक्षणाची आस आहे. शिकून मोठं होण्याची आकांक्षा तिने बाळगली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा