शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसांना जबर मारहाण : चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:18 IST

रेल्वे स्टेशन आवारातून गर्दी पांगविताना झालेल्या वादातून दोघा रेल्वे पोलिसांना चार जणांनी शिव्यांची लाखोली वाहत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अहमदनगर : रेल्वे स्टेशन आवारातून गर्दी पांगविताना झालेल्या वादातून दोघा रेल्वे पोलिसांना चार जणांनी शिव्यांची लाखोली वाहत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुक्रवारी (दि.२६) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हाणामारीची ही घटना घडली. याबाबत कोतवाली पोलिसांत शासकीय कामात अडथळा झाल्याची नोंद करण्यात आली आहे.दत्ता गायकवाड, अभिजीत गायकवाड, अजित गायकवाड, इसाक मेहबूब (सर्व रा. रेल्वे स्टेशनसमोर, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत हेड कॉन्स्टेबल संजय श्रीधर पालवे (वय ३७ , अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाणे, जि.पुणे लोहमार्ग रा. श्रीराम कॉलनी, केडगाव) यांनी फिर्याद दिली. पालवे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल गणेश दहिफळे यांनाही मारहाण करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या गेटवर मारहाण झालेला इसम लोहमार्ग पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी ठाणे अंमलदार ड्यूटीचा चार्ज सहका-यास देत पालवे यांनी पोलीस कॉन्स्टेबल गणेश दहिफळे यांना सोबत घेत रेल्वे स्टेशनच्या गेटवर गेले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून गर्दी पांगवित होते. त्यावेळी हॉटेल दत्ताचे मालक दत्ता गायकवाड याने दोघा पोलिसांना ही तुमची हद्द नसल्याचे सांगत शिवीगाळ केली. त्यानंतर पालवे यांच्या खाकी वदीर्ला पकडून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी अभिजित गायकवाड, अजित गायकवाड, इसाक मेहबूब यांनीही पालवे व दहिफळे यांना मारहाण करत सूर्या हॉटेल व दत्ता हॉटेलच्या बोळीत ओढत नेले. त्यावेळी दत्ता गायकवाड याने या दोघांना खोलीत कोंडा व जीव मारा, असे सांगितले. त्यावेळी दहिफळे याने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. तेथून इतर सहका-यांना आपबिती सांगत पोलीस कुमक घेत घटनास्थळी धाव घेतली आणि पालवे यांची सुटका केली. याबाबत वरील चारही आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळासह भादंवि ३३२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस