शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

विद्यार्थ्यांना मिळाला ‘एज्युकेशनल गाईड’

By admin | Updated: June 8, 2014 00:37 IST

लातूर : शहरातील टाऊन हॉल येथे सुरु असलेल्या एस्पायर लोकमत एज्युकेशन फेअरला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़

लातूर : शहरातील टाऊन हॉल येथे सुरु असलेल्या एस्पायर लोकमत एज्युकेशन फेअरला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ या उपक्रमामुळे एकाच छताखाली राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांची दालने उपलब्ध झाल्याने त्याचा लातूरबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगला लाभ मिळत आहे़ विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्रातील संधीची माहिती मिळण्याबरोबरच करिअरसाठी योग्य असे मार्गदर्शन मिळत असल्याचे गौरवोद्गार या शैक्षणिक प्रदर्शनास भेट देणारी मंडळी काढत आहेत़ तज्ज्ञांचे मार्गदर्शनएस्पायर लोकमत एज्युकेशन फेअर अंतर्गत शुक्रवारच्या सेमिनारमध्ये ‘चला यशस्वी होऊ या’ या विषयावर मुंबईचे विवेक मेहेत्रे यांनी मार्गदर्शन केले. तसेच राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निकचे प्रा़ एस़ व्ही़ नवरखेले यांचे व्यावसायिक तंत्रशिक्षणातील नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन झाले़ शनिवारी अ‍ॅडमिशन प्रोसेस आॅफ पॉलिटेक्निक अ‍ॅण्ड एमसीए या विषयावर एमडीए पॉलिटेक्निकचे प्रा़ सचिन कराड, ‘करिअरमध्ये एमबीएचे महत्त्व’ या विषयावर डी़ बी़ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटशनचे डॉ़ श्रीकांत ढगे यांचे, एमपीएसटी/ यूपीएससी मार्गदर्शन विषयावर पुण्याच्या द युनिक अ‍ॅकॅडमीचे नागेश गव्हाणे यांनी, करिअर इन अ‍ॅनिमेशन यावर संतोष रासकर तर व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संवाद व अभ्यास कौशल्य यावर दि व्हर्टेक्स अ‍ॅकॅडमीचे प्रा़ बलदेव माचवे यांचे मार्गदर्शन झाले़ चांदीच्या नाण्यांचे विजेते...शनिवारच्या चांदीच्या नाण्यांचे विजेते विश्वास लातूरकर, चेतन शंकरसिंग, सुमित बेद्रे, जोगदंड महासिध्देश्वर, सागर ठाकूर, अभिषेक शिवल हे ठरले़आजचे मार्गदर्शन...एमपीएससी/युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची एकत्रित तयारी कशी करावी, या विषयावर दुपारी ४ वाजता सुनील शेळगावकर यांचे, ‘बँकिंग परीक्षांची ओळख’ यावर सायं. ५ वाजता पुण्याचे सुबोध करकरे यांचे तसेच सायं. ६ वा. वर्षा सुर्वे यांचे रविवारी टाऊन हॉल येथे सुरू असलेल्या प्रदर्शनात मार्गदर्शन होणार आहे.आजच्या विद्यार्थ्यांचा स्वयंरोजगाराकडे ओढा आहे़ आपला सर्वांगीण विकास व्हावा, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे़ आम्ही व्यक्तिमत्त्व विकास, प्रात्यक्षिकांवर भर देतो, असे हासेगावच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निकचे विशाल बिडवे यांनी सांगितले़गरीब विद्यार्थ्यांना मनात इच्छा असूनही चांगल्या शैक्षणिक संस्था निवडता येत नाहीत़ लोकमतच्या या प्रदर्शनामुळे राज्यातील शैक्षणिक संस्थांची माहिती होण्याबरोबरच सेमिनारमध्ये चांगले मार्गदर्शन मिळत असल्याचे लातुरातील व्यंकट काकनाळे यांनी सांगितले़लोकमतच्या या प्रदर्शनामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी घरापर्यंत पोहोचल्या आहेत़ येथील शैक्षणिक दालनांमुळे नामांकित शैक्षणिक संस्थांची सखोल माहिती मिळाली आहे, असे विद्यार्थिनी सूर्याली राजेश धर्माधिकारी हिने सांगितले़हे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व दिशादर्शक ठरणारे आहे़ १२ वीनंतर विविध शैक्षणिक संधी असल्याची माहिती मिळाली़ करिअरसाठी हे प्रदर्शन फायदेशीर आहे़ विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असे मत उदगीरच्या मिर्झा निहाद मौलानाबेग याने व्यक्त केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना १२ वीनंतर काय करावे याची माहिती नसते़ लोकमतचे प्रदर्शन, सेमिनार यामुळे विद्यार्थ्यांना नवीन कोर्सची माहिती होत आहे़ सेमिनारमधील मार्गदर्शन फायद्याचे ठरल्याचे चिंचोली ब़ येथील दीपाली माळी हिने सांगितले़अनेक मुला- मुलींना नेमके कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यावा, याची माहिती नसते़ त्यामुळे ते गांगरुन जातात़ लोकमतच्या या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्ग सापडण्यास मदत झाल्याचे कामखेडा येथील माहेश्वरी भोसले म्हणाली.लोकमतच्या एस्पायर एज्युकेशनल फेअरमुळे विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्राविषयी माहिती एकाच छताखाली मिळत आहे़ विद्यार्थी, पालकांना त्याचा लाभ होत असल्याचे लातुरातील डी़ बी़ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सचे संचालक डॉ़ श्रीकांत ढगे यांनी व्यक्त केली़पुण्यातील मुले स्वत: क्षेत्र निवडतात. येथील पालक मुलांच्या शिक्षणाबाबत जागृत आहेत. ‘लोकमत’च्या उपक्रमामुळे आम्हाला ग्रामीण भागापर्यंत पोहोचता आले, असे आकुर्डी येथील डॉ़ डी़ वाय़ पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्सचे सुषिश टोपणेकर यांनी सांगितले.लोकमतमुळे ग्रामीण विद्यार्थी, पालकांना मोठा लाभ होत आहे. शैक्षणिक संस्था सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत़ या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सुटण्यास मदत होत असल्याचे औैशाच्या एनबीएस़ इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निकचे सौदागर बामणे यांनी सांगितले़लोकमतच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती सहज मिळत आहे़ येथे अभियांत्रिकी संस्थांची दालने असल्याने माझ्या सारख्या विद्यार्थ्यास पुणे, औरंगाबाद सारख्या शहरात जाण्याची गरज भासत नसल्याचे मत विद्यार्थी सुशांत दुधभाते याने व्यक्त केली़लोकमतच्या या प्रदर्शनामुळे नवीन संधीची माहिती मिळाली. आजचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत़ अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा़ दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत़ याची माहिती येथे मिळत असल्याचे शितल रवि रेड्डी यांनी सांगितले.लोकमतच्या या प्रदर्शनामुळे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना इतर नवीन शैक्षणिक क्षेत्रांची माहिती मिळत आहे़ त्यामुळे नवनवीन क्षेत्रात विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात़ ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी लोकमतने संधी उपलब्ध करुन दिली असल्याची प्रतिक्रिया अमोल इगवे याने दिली.या प्रदर्शनातील प्रत्येक दालनास विद्यार्थी भेट देऊन चौकशी करीत आहेत़ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सहज माहिती मिळते. त्यामुळे नेमके क्षेत्र निवडण्याविषयी मार्गदर्शन होत आहे़ प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे शेळगावकर्स युनिक अ‍ॅकॅडमी, लातूरच्या सुप्रिया गोरोबा जाधव यांनी सांगितले़एस्पायर लोकमत एज्युकेशन फेअरमुळे विद्यार्थ्यांना नवनवीन कोर्सची माहिती मिळत आहे़ या उपक्रमात अभियांत्रिकी संस्थांची दालने असल्याने फायदा होत आहे़ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास निश्चित भेट द्यावी, अशी प्रतिक्रिया लातुरातील गंगासागर प्रदीप फड या महिला पालकाने व्यक्त केली़लातुरात शैक्षणिक संस्थांची दालने उभारल्याने १२ वीपर्यंतचे शिक्षण घेऊन नवीन संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे़ अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कोर्स निवडण्याचे समजत नाही़ या प्रदर्शनामुळे ही सुविधा उपलब्ध झाल्याचे कौशल तम्मेवार या विद्यार्थ्याने सांगितले.लोकमतने एकाच छताखाली राज्यातील शैक्षणिक संस्थांची दालने खुली करुन दिल्याने पालकांना करावी लागणारी भटकंती दूर झाली आहे़ त्यामुळे लोकमतचे कौतुक करावे तितके थोडे आहे़ माहिती मिळाल्याने निर्णय घेणे सुलभ होणार आहे, अशी प्रतिक्रिया लातुरातील शेख अजीम अहेमद यांनी व्यक्त केली़