शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या स्वागताने विद्यार्थी भारावले

By admin | Updated: June 18, 2014 01:22 IST

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंचने नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ केला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मुख्याध्यापकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंचने नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ केला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मुख्याध्यापकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.आज शाळेचा प्रथम दिवस, पहिल्याच दिवशी लोकमतने आमच्या विद्यार्थ्यांचा आणि आमच्या सर्व शिक्षकांचा स्वागत व सन्मान केला. त्याबद्दल प्रथमत: लोकमत वृत्तपत्र संपूर्ण समूहाचे आम्ही सर्व शिक्षक आभारी आहोत. लोकमत नेहमी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत असते. याही वर्षी परिपाठ व त्यात बोधकथा सुविचार मननीय विचार आदींचा जास्तीत जास्त वापर व्हावा व विद्यार्थी गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने कार्यक्रम व्हावेत ही अपेक्षा.- बी. एफ. वाकचौरे, मुख्याध्यापकश्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयआज सोमवार दि. १६/६/२०१४ शाळेचा पहिला दिवस आज पहिल्या दिवशी लोकमत समूहाने शाळेला भेट देवून सर्व अध्यापक विद्यार्थ्यांचा स्वागत करून सन्मान केला. - पी. बी. जगदाळे, मुख्याध्यापक भिंगार हायस्कूल, भिंगारआज शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा फुलून आली आणि आजच लोकमतच्या सदस्यांनी शाळेला भेट दिली व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. लोकमत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास चालना देतात. आम्ही सर्व शिक्षक, शाळेतर्फे हार्दिक शुभेच्छा !धन्यवाद !- सु. अ. पाचंगे, मुख्याध्यापकनवीन मराठी शाळा, भिंगारसन २०१४-२०१५ मध्ये आम्ही प्रोजेक्टर हॉलची संख्या वाढवून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संगणक प्रशिक्षणाची संधी देऊन गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन देणार आहे. क्रीडा क्षेत्रातही प्रगती करणार आहे. - सी. जी.तांबे, प्राचार्य श्रीमती अ‍ॅबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल भिंगार आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नगरसेवक अनिल शिंदे यांच्या हस्ते इ. ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप झाले. लोकमत परिवारातर्फे विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम राबविले जातात. त्या सर्वांमध्ये शाळेचा उत्तम प्रतिसाद व सहभाग असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी दर वर्षाप्रमाणेच विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. - सौ. मावची कुसूम सेगा, मुख्याध्यापिका रूपीबाई मो. बोरालोकमत समूहातर्फे नेहमीच विद्यार्थ्यांना बौद्धिक चालना देणारे उपक्रम घेण्यात आलेले आहेत. या पुढेही असेच उपक्रम विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वाढीसाठी घेण्यात यावेत ही अपेक्षा.- बा. ल. ठोकळ, मुख्याध्यापक भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल नवीन वर्षात मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांचा बौद्धिक विकास वाढावा यासाठी वैयक्तिक लक्ष आमचे प्रत्येक मुलांकडे राहील. लोकमत बालविकास मंच विविध स्पर्धा घेऊन मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्तुत्य उपक्रम करत आहे. यामुळे मुले व शाळा यांच्या प्रगतीमध्ये भर पडत आहे. - व्ही. आर. लोखंडेनवीन मराठी शाळा विश्रामबाग अ. नगरया विद्यालयामध्ये वर्षात गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम, कृती संशोधन इत्यादी उपक्रम, त्याचप्रमाणे यावर्षी मुलांसाठी ज्युदो कराटे, स्वयंम संरक्षणासाठी मार्गदर्शन, बॅण्ड पथक, लेझीम पथक, झांज पथक इ. उपक्रम राबविणार असून लोकमतने सुरू केलेला बालविकास मंच व विविध स्पर्धा घेऊन बालविकास मंचद्वारे विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक वृद्धी करण्याचे अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवत आहात. - सुनील पंडित, प्राचार्यप्रगत माध्यमिक विद्यालय, नवीपेठ, अहमदनगरशैक्षणिक वर्षात गुणवत्तासाठी विविध उपक्रम घेण्याचा मानस आहे. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी सर्वांगीण विकासास प्रोत्साहित करणे. - सौ. एस. व्ही. धिमते , मुख्याध्यापिकाकै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळा, नवीपेठ अहमदनगरया नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा आमचा मानबिंदू असणारा उपक्रम म्हणजे स्कॉलरशीप इ. ४ थी चा मुले जास्त कसे टिकून राहतील व राज्य व जिल्हा यादीत मुले कसे जास्त येतील याकडे विशेष लक्ष देणार आहे. इ. ३ री च्या प्रज्ञाशोध परीक्षा याकडे सुद्धा जास्त मुले कशी येतील याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.- एम. व्ही. वैद्यबाई इचरजबाई फिरोदिया प्रशाला, नवीपेठ, अहमदनगरविद्यार्थी हेच मी माझे आराध्य दैवत समजतो. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला अद्ययावत आणि दर्जेदार भौतिक सुविधांमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहील. शाळेतील एकही विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही. त्यांना त्यांचे सर्व लाभ मिळवून दिले जातील.- अ. रा. दोडकेरेसिडेन्शिअल विद्यालय, अहमदनगरमाझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी विज्ञाननिष्ठ व्हावेत यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक शिक्षणासाठी किमान उपक्रम दिला आहे. त्यातून विद्यार्थी जिज्ञासू व उपक्रमशील बनेल हे पहाणार आहे. - बी. ए. चव्हाणरेणावीकर माध्यमिक विद्यालय, सावेडी, अहमदनगर१६ वर्षाचा मुख्याध्यापक पदाचा अनुभवाचा फायदा शाळेला करून देणार आहे. मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार शाळेत यंदा इंग्रजी विषयाकडे अधिक लक्ष देणार आहे. तसेच खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम याकडेही विशेष लक्ष देणार आहे. माझा भर टीम वर्क उत्तम करण्यावर असेल.- अ. ज. खिलारेरेणावीकर प्राथमिक विद्यामंदिर, सावेडीयावर्षी शाळेत प्रत्येक महत्वाचे दिन साजरे करणार आहोत. जास्तीत जास्त उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देणार आहोत. - एस. एस. कुलकर्णी, मुख्याध्यापिका श्री समर्थ विद्यामंदिर, सावेडी, परीक्षेचा ताण कसा घालवावा याबाबतचे मार्गदर्शनपर व्याख्यान घेणार आहोत. त्याचप्रमाणे समाजसेवा आणि गर्ल गाईड या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थांना भेटी देऊन सामाजिकता जपण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये रूजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. - पी. सी. तळेगावकर, मुख्याध्यापिका श्री समर्थ विद्यामंदिर, सांगळेगल्ली