शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फी न भरल्याने विद्यार्थ्यास वडगाव पान येथील शाळेतून हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:57 IST

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील लोट्स इंग्लिश मीडियम स्कूलमधून एका सातवीच्या शालेय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतून हाकलून देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याबद्दल संबंधित पालकाने संगमनेर येथील गटशिक्षणाधिका-यांकडे तक्रार दाखल केलेली आहे.

संगमनेर : तालुक्यातील वडगाव पान येथील लोट्स इंग्लिश मीडियम स्कूलमधून एका सातवीच्या शालेय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतून हाकलून देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याबद्दल संबंधित पालकाने संगमनेर येथील गटशिक्षणाधिका-यांकडे तक्रार दाखल केलेली आहे.लोट्स स्कूलच्या मुख्याध्यापकांनी सातवीतील एका विद्यार्थ्यास फीचे एक लाख रुपये घेऊन ये, अन्यथा, तुला शाळेत बसून दिले जाणार नाही, असे सांगून विद्यार्थ्यास शाळेतून हाकलून दिले. यामुळे तो विद्यार्थी आठ दिवसांपासून शाळेत न जाता घरीच थांबत आहे. ज्या विद्यार्थ्यांची फी भरावयाची बाकी आहे, त्यांना संस्थेच्या मालकीच्या स्कूल बसमध्ये बसू न देण्याचे आदेश बस चालकाला दिले आहेत. त्याचप्रमाणे शाळेची टप्प्याटप्प्याने फी भरणाºया पालकांकडून कोरे सहीचे धनादेश घेतले जातात. नंतर त्या पालकांचे धनादेश मुद्दाम बँकेत वटवून त्यांना कोर्ट कचेरीची धमकी दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांची फी भरावयाची राहिली, अशा विद्यार्थांना घटक चाचणीला बसू न देता वर्गाबाहेर हाकलून दिले जाते. विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रास देऊन छळवणूक केली जात आहे, असे पालक रामनाथ बोºहाडे यांनी गटशिक्षणाधिका-यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

शाळेची फी न भरल्यामुळे कोणत्याही शिक्षण संस्थांनी विद्यार्थांना घरी पाठवू नये किंवा शालेय साहित्य खरेदी करण्यास सक्ती करू नये. याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संबंधित केंद्र प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच तथ्य आढळल्यास संबंधित संस्थेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.-साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी, संगमनेर.

आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून बाहेर हाकलून दिलेले नाही किंवा आमच्याकडून कोणत्याही विद्यार्थास परीक्षेच्या कालखंडात फी न भरल्यामुळे वर्गाच्या बाहेर बसून दिले जात नाही. आम्ही शासनाच्या नियमानुसार शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे.- नीलिमा निघुते, संस्थापक सदस्य, लोट्स इंग्लिश मीडियम स्कूल, वडगाव पान.

शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय फीबाबत व आरटीई नियमानुसार कोणत्या विद्यार्थ्याला शालेय आर्थिक वर्षात मोफत प्रवेश दिला गेला. पालकांना सध्या कागदावर शाळेची फी भरल्याची पावती दिली जाते. त्यामुळे निश्चित फीबाबत पालक संभ्रमावस्थेत आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करावी.-रामनाथ बो-हाडे, पालक

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरSchoolशाळा