संगमनेर (जि. अहमदनगर) : बारावीच्या परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य आल्याने सौरभ बाळासाहेब लांडगे (१७, रा.नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) याने शेततळ्यात उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.मंगळवारी बारावीचा आॅनलाईन निकाल होता. निकाल आल्यानंतर अनुत्तीर्ण झाल्याची बाब समजल्यानंतर सौरभ याने शेततळ्यात उडी मारली. संध्याकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
बारावीत नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 05:11 IST