शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये एसटीचे चाक ‘पंक्चर’; दोन महिन्यांत ४२ कोटींचे उत्पन्न बुडाले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:13 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेले लॉकडाऊन. त्यामुळे एसटी बस बंद करण्याचा निर्णय आणि त्याचा परिणाम नगर विभागाचे दररोजचे बुडालेले ७० लाखांचे उत्पन्न. यावरून दोन महिन्यांचा हिशोब केला तर तब्बल ४२ कोटींचा फटका एसटी महामंडळाच्या नगर विभागाला बसला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात चाललेले एसटीचे चाक आता पुरते ‘पंक्चर’ झाले आहे.

चंद्रकांत शेळके । अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेले लॉकडाऊन. त्यामुळे एसटी बस बंद करण्याचा निर्णय आणि त्याचा परिणाम. नगर विभागाचे दररोजचे बुडालेले ७० लाखांचे उत्पन्न. यावरून दोन महिन्यांचा हिशोब केला तर तब्बल ४२ कोटींचा फटका एसटी महामंडळाच्या नगर विभागाला बसला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात चाललेले एसटीचे चाक आता पुरते ‘पंक्चर’ झाले आहे.कोरोनाचा फटका सर्वच उद्योगधंदे, रोजगाराला बसला असून गेल्या दोन महिन्यांपासून जागेवर    उभ्या असलेल्या बसमुळे  एसटी महामंडळही कमालीचे अडचणीत सापडले आहे. खासगी प्रवासी वाहतुकीचे अतिक्रमण, वाढलेले डिझेलचे भाव, जुन्या झालेल्या गाड्या यामुळे आधीच एसटी बससेवा तोट्यात सुरू होती. त्यात लॉकडाऊन जाहीर होऊन सर्वच बस बंद करण्याचा निर्णय झाल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला.केवळ नगर विभागाचा विचार केला, तर जिल्ह्यातील ११ आगारांच्या एकूण ७०० बस दररोज रस्त्यांवर धावतात. जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा व आंतरराज्य अशा एकूण ४२०० फेºया दररोज नगर जिल्ह्यातून होत होत्या. त्यापोटी नगर विभागाला दररोजचे सरासरी ७० लाखांचे उत्पन्न मिळत होते. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे २१ मार्चपासून सर्व बस आगारात उभ्या आहेत. तब्बल दोन महिने जागेवर उभी राहिल्याने बसचा मेंटेनन्सही वाढला आहे.दरम्यान, तब्बल दोन महिन्यांनंतर २२ मेपासून राज्यात बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बसमध्ये केवळ ५० टक्केच प्रवाशांना बसण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बसला ५० टक्के कमी प्रवाशात म्हणजे तोट्यात या बस चालवाव्या लागणार आहेत. एकूणच बस बंद असतानाही तोटा व आता बस सुरू झाल्या तरी तोटा अशा दुहेरी पेचात सध्या बससेवा सापडली आहे.महामंडळाला दुहेरी फटका एकीकडे बस बंद असल्याने दररोज होणारे कोट्यवधींचे नुकसान, तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये सर्व कर्मचा-यांचा करावा लागणारा पगार असा दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसला आहे. 

नगर विभागाचे दररोजचे सरासरी ७० लाखांचे उत्पन्न होते. ते या लॉकडाऊनमध्ये बुडाले. दरम्यानच्या काळात शेकडो बसमधून नगर जिल्ह्यातून परप्रांतीयांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. आता बस सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तोटा होत असला तरी सेवा देणे हे महामंडळाचे कर्तव्य आहे, असे अहमदनगरचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी संगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडी