शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा येथे ठेवीदारांचा रस्त्यावरच ठिय्या : निबंधकांचे लेखी आश्वासन, आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:52 IST

सोनई येथील श्री वेंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार शुक्रवारी दुपारी नेवासा येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर आत्मदहनासाठी जमले असता त्यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात कार्यालयाच्या समोरच अडविले.

नेवासा : सोनई येथील श्री वेंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार शुक्रवारी दुपारी नेवासा येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर आत्मदहनासाठी जमले असता त्यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात कार्यालयाच्या समोरच अडविले. त्यामुळे ठेवीदारांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने चाचणी लेखा परिक्षणाचा अहवाल आल्यानंतर संचालक मंडळावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन सहायक निबंधक यांनी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.सोनई येथील श्री वेंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंसंस्थेमध्ये घोटाळा झाला असून ठेवीदारांचे सुमारे कोट्यावधी रुपये अनेक महिन्यापासून अडकले आहेत. याबद्दल ठेवीदारांनी गेले दोन वर्षे अनेकदा निवेदने व आंदोलने केली मात्र अद्याप ठेवी परत मिळाल्या नाहीत तसेच मागील दोन महिन्यांपूर्वी एक ठेवीदारांने सहायक निबंधकांसमोर विष प्राशन करण्याचा प्रयन्त केला होता. दरम्यान संस्थेच्या चौकशीसाठी त्रीसदस्य समिती केली होती तसेच लेखा परीक्षण ही करण्यात आले. त्यात कर्मचारी, पदाधिकारी दोषी आढळले पण फक्त कर्मचा-यांवरच कारवाई झाली. संचालकांवर कुठलीही कारवाई झालेली नसल्याने संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावे, ही प्रमुख मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. संस्थेची चाचणी लेखा परीक्षण पूर्ण करून पंधरा दिवसात अहवाल सादर होणार आहे. सदर अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन विशेष लेखा परीक्षक एस.डी.कुलकर्णी व सहायक निबंधक दीपक नागरगोजे यांनी ठेवीदारांना दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी अभय भळगट, विष्णू वीरकर,रामभाऊ सुद्रीक,सुभाष लुनिया,महावीर दरक,संजय खंडागळे,आशा कुलकर्णी,मीना भालेराव यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते. या आंदोलनावेळी नेवाशाचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे व सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी नेवासा व सोनई पोलीस ठाण्याच्या मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा