शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये धनगर समाजाचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 14:45 IST

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकल आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीने बाजार समितीच्या आवारातून वाजत गाजत, घोषणा देत मोर्चाने जाऊन खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

जामखेड : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकल आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीने बाजार समितीच्या आवारातून वाजत गाजत, घोषणा देत मोर्चाने जाऊन खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन केले.भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाची अनुसूचित जमाती मध्ये समावेश भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तरतूद करून ठेवली तरी ते आरक्षण मिळवण्यासाठी ७० वर्षांपासून संघर्ष करावा लागतो आहे. सध्याच्या सत्ताधारी सरकारने चार वर्षांपासून खेळवत ठेवले. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे लागत असल्याचे आदिवासी धनगर आरक्षण समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.सकाळी धनगर बांधवांनी छत्रपती शिवाजी बाजार समितीच्या आवारातून ढोल ताशांच्या गजरात मेंढ्यांसह मोर्चाने जाऊन खर्डा चौकात रास्तारोको केला. शालेय विद्यार्थिनी काजल भोगे, गायत्री मासाळ, अक्षिदा देवकाते, नम्रता हजारे, रंगनाथ ठोंबरे, विजय कोकाटे यांची भाषणे झाली. सकल आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीचे अक्षय शिंदे, डॉ. कैलास हजारे, विकास मासाळ, नितीन हुलगुंडे, सचिन हळनावर, संजय खरात, मोहन देवकाते, आनंद खरात, गणेश देवकाते, मारूती सजगणे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनास सकल मराठा समाजाचे संयोजक मंगेश आजबे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष अरूण जाधव, विकास राळेभात, अण्णासाहेब ढवळे, रमेश आजबे यांनी पाठिंबा दिला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड