शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष कार्यालयात जाणे थांबले, शिबिरे बंद; पुरोगामी पिढी घडविण्यात अपयश आले: माजीमंत्री बाळासाहेब थोरात

By शिवाजी पवार | Updated: November 20, 2023 16:06 IST

पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला.

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. सत्तेवर असताना पक्ष कार्यालयात जाण्याचे नेत्यांनी बंद केले. पक्षाची शिबिरेही थांबली, अशी खंत माझी मंत्री व काँग्रेस पक्षाची ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून देशांतील लोकशाही डळमळीत झाली आहे, अशी भीती थोरात यांनी व्यक्त केली.

कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार श्रीरामपूर येथे रविवारी सायंकाळी माजीमंत्री थोरात यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना थोरात बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो, आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, करण ससाणे, सचिन गुजर, साधना गायकवाड, सुभाष लांडे, बन्सी सातपुते आदी यावेळी उपस्थित होते. खंडकरी नेते अण्णासाहेब थोरात यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.

थोरात म्हणाले, भारतीय लोकशाही धोक्यात आल्याचे चित्र आहे. पुढील काळात मताचा अधिकार देखील सुरक्षित राहण्याविषयी आपल्याला शंका आहे. शेतकरी विरोधी तीन कायदे शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सरकारने मागे घेतले. मात्र याबरोबरच तीन नवीन कामगार कायदे अस्तित्वात आले आहेत. त्यात कामगारांना युनियन करण्याची संधी देखील काढून घेण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेचे काय होणार, याची काळजी वाटावी अशी स्थिती आहे.  हे असे का घडले याचा विचार करणे गरजेचे आहे. काँग्रेससह डावे पक्ष पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात कमी पडले. लोकशाही मूल्ये तरुणांमध्ये रुजविण्यात आपण सर्वजण कमी पडलो. राष्ट्र सेवा दलांची शिबिरे काही प्रमाणात सुरू आहेत, असे थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस