शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राहात्यात कांदा उत्पादकांचा रास्ता रोको

By admin | Updated: July 23, 2016 00:13 IST

राहाता : राहाता बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता़ परंतु कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे उत्पादन खर्चही निघू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़

राहाता : राहाता बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता़ परंतु कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे उत्पादन खर्चही निघू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ नगर- मनमाड महामार्गावर तब्बल तीन तास आंदोलन केल्याने वाहतूक दुतर्फा खोळंबली होती़ लासलगाव, येवला यासह राज्यातील अनेक बाजार समित्या बंद असताना शेतकऱ्यांना आपला माल विकता यावा या करीता राहाता येथील कांदा मार्के ट सुरु ठेवले आहे़ यामुळे नेहमी ३० हजार गोण्यांची आवक असलेल्या राहाता बाजार समितीत नाशिक, वैजापूरसह नगर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या ६० हजार पेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक शुक्रवारी झाली होती़ सकाळी लिलाव सुरु झाल्यानंतर चारशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल भाव निघाल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला़ बारा वाजता नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको सुरु केले़ बाजार समितीच्या वतीने सभापती भाऊसाहेब आहेर, सचिव उध्दव देवकर यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते़ लिलाव झालेल्या भावात वाढ करा, या मागणीवर अडून बसले होते़ घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास पवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले़ मात्र शेतकऱ्यांचा मोठा जमाव पाहता त्यांनी शिर्डी व लोणी येथील बंदोबस्त बोलावून घेतला़ बाजार समितीच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला़ मात्र भाव वाढवून मिळावा या करीता शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत तीन तास आंदोलन केले़ नगर-मनमाड महामार्गावर दोन्ही बाजूला सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याने साईभक्तांसह प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले़(वार्ताहर)