शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

नगर - पाथर्डी महामार्गावर तीन तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:42 IST

अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे ६ वाजता भरधाव कोल्हापूर-पाथर्डी या एस.टी. बसने देवराई गावात समोरून येणाऱ्या मोटारसायकलीस धडक दिली.

करंजी : अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे ६ वाजता भरधाव कोल्हापूर-पाथर्डी या एस.टी. बसने देवराई गावात समोरून येणाऱ्या मोटारसायकलीस धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. या अपघातानंतर करंजी पोलीस दूरक्षेत्र चौकीशी संपर्क होत नसल्याने संतप्त जमावाने पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देत ३ तास कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर ३ तास रास्तारोको केला.निमगाव (मायंबा, ता. शिरूर, जि. बीड) येथील राहुल महादेव राठोड व त्यांची पत्नी मनीषा महादेव राठोड हे आपल्या दुचाकीवरुन (क्रमांक एम. एच.१२ पी यु ३२३५) पुण्याकडे जात होते. सकाळी ६ वाजता देवराई गावात समोरून भरधाव येणाºया कोल्हापूर-पाथर्डी (क्रमांक एम.एच. १४ बीटी ४८७५) या पाथर्डी आगाराच्या बसने समोरून जोराने धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघात होताच बसचालक शिवाजी खेडकर व वाहक आदिनाथ आंधळे अपघातस्थळाहून पसार झाले. अपघाताची माहिती देण्यासाठी देवराई ग्रामस्थांनी करंजी पोलीस दूरक्षेत्र चौकीस व पाथर्डी पोलीस ठाण्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण दूरध्वनी बंद असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी घोषणाबाजी करीत रास्तारोको सुरू केला.नगर-पाथर्डी महामार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. अनेकांचे बळी या रस्त्याने घेतल्याने संबंधित ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, दोन दिवसात रस्त्याचे बंद पडलेले काम सुरू करावे, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी नगरहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून संबंधित ठेकेदारास बोलावून घेऊन येथील काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत होऊन आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात अ‍ॅड. सतीश पालवे, देवराईच्या सरपंच ताराबाई क्षेत्रे, क्रांतीदलाचे विष्णूपंत पवार, संभाजीराव वाघ, विजय कारखेले, राजेंद्र पालवे, रवीभूषण पालवे, रामनाथ पालवे, किसन आव्हाड, राजू गोरे, आदिनाथ पालवे, अंकुश पालवे, संजय तेलोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर