शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:46 IST

राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित नवीन इमारतीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड मार्गावर जिजाऊ चौकात

राहुरी : राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रलंबित नवीन इमारतीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड मार्गावर जिजाऊ चौकात बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.जोपर्यंत कुदळ टाकून भूमीपजून होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. ग्रामीण रुग्णालय होणार असेल तर शहरातील जुन्या जागेतच व्हायला हवे. कुणाचेही मनसुबे सफल होवू देणार नाही. या ज्वलंत प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आत्मदहन करू, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी दिला.आंदोलनप्रसंगी थोरात यांनी प्रशासनाच्या चालढकलीबाबत तीव्र शब्दात निषेध नोंदविला. दोन दिवसात भूमीपूजन करुन तात्काळ बांधकामास सुरुवात करावी. नगर-मनमाड मार्गावर अपघात झाल्यानंतर तात्काळ सुविधा न मिळाल्याने अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. येथून पुढे आरोग्य असुविधेमुळे कोणाचा मृत्यू ओढवला तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी पापा बिवाल, सचिन साळवे, निलेश जगधने, गुलशन बिवाल, तानसेन बिवाल, बाबासाहेब शेलार, राजेंद्र जगधने, कांतीलाल जगधने, संजय संसारे, तुषार दिवे, सीताराम दिवे, किशोर पंडीत, मयुर कदम, विकी पंडीत, किरण पंडीत, नेल्सन कदम, माउली भागवत, बाळू पडागळे आदींसह रिपाइं कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. तहसीलदार अनिल दौंडे, आरोग्य प्रशासनाचे जिल्हा निवासी वैद्यकिय अधिकारी संजीव बेळंबे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता फुलचंद जाधव, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाठ हजर होते. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दीड तास सुरु राहिलेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुर्तफा वाहतूक कोंडी झाली होती.आरोग्य, बांधकाम विभागाची टोलवाटोलवीआरोग्यसेवा मरनासन्न अवस्थेत आहे. येथे कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत. रुग्णालय इमारतीसाठी जागा उपलब्ध आहे. शासनाचा निधी मंजूर आहे. मात्र एका इसमाच्या अर्जावर बांधकाम बंद ठेवून रुग्णालयाच्या प्रश्नावर बांधकाम विभाग, आरोग्य खाते टोलवाटोलवी करत आहेत, असा आरोप अरुण साळवे यांनी केला. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर