शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

संगमनेरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: July 8, 2016 23:33 IST

संगमनेर: व्यापाऱ्यांनी डाळिंब खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले.

संगमनेर: बाजार समितीने व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून आडत न घेण्याची सूचना केल्यानंतर व्यापाऱ्यांनी डाळिंब खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व शेतकरी यांच्यात डाळिंब खरेदीवरुन शुक्रवारी सकाळी वादावादी झाली. शेतकऱ्यांनी आपला डाळिंबाचा माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणला होता. बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आडत वसूल न करण्याचे पत्र दिल्याने व्यापाऱ्यांनी डाळिंबाचा माल खरेदी न करण्याचे धोरण स्विकारले. व्यापाऱ्यांनी माल घेणार नाही अशी कोणतीही सूचना शेतकऱ्यांना दिली नव्हती त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल खरेदी करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती़ मात्र व्यापारी लिलावात सहभागी होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले . आंदोलनाची माहिती मिळताच उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांना महामार्गावरुन बाजार समितीच्या आवारात नेले. यावेळी सभापती शंकर खेमनर, उपसभापती सतीश गोडगे, सचिव सतीश गुंजाळ, शेतकरी, व्यापारी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर चर्चेमध्ये शुक्रवारचा माल शासन नियमाप्रमाणे आडत न घेता खरेदी करण्याचे ठरले. गुरुवारच्या बाजारभावा प्रमाणे डाळिंब माल घेण्याची हमी व्यापाऱ्यांनी दिल्याने हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतले. बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)