चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील जळालेली रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची होणारी अडवणूक तात्काळ थांबवा. अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत महावितरण कार्यालयात तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन करू, असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी दिला.
महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता कोपणर यांना कोकाटे यांनी मंगळवारी निवदेन दिले. कोकाटे म्हणाले, महावितरण कार्यालयाने नगर तालुक्यातील जळालेले रोहित्र बदलून देताना शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे काम चालवले असून रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी आधी थकीत वीजबिल भरा मगच आम्ही रोहित बदलून देऊ, अशी मुजोरीची भाषा अधिकारी शेतकऱ्यांसमवेत करत आहेत. याबाबत मी स्वतः शहानिशा केली असता सांडवे गावातील शिंदे वस्ती येथील जळलेले रोहित्र बदलून देण्यासंदर्भात मी अधिकाऱ्यांना संपर्क केला असता अधिकाऱ्यांकडून उद्धटपणे उत्तर देण्यात आले. ही बाब अत्यंत गंभीर व लाजिरवाणी आहे. महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्यांची थकीत वीज बिल भरण्यावरून होत असलेली अडवणूक अत्यंत निंदनीय असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
010621\img-20210531-wa0131.jpg
जळालेली रोहित्र बदलून देतांना शेतकऱ्यांची अडवणूक ताबडतोब थांबवण्याचे निवेदन महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कोपनर यांना भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी सोपवले