शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र मुलाचा बापाने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 14:11 IST

पाच वर्षाच्या सावत्र मुलाचा बापाने गळा आवळून खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे झाली.

टाकळी ढोकेश्वर : पाच वर्षाच्या सावत्र मुलाचा बापाने गळा आवळून खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे झाली. खून करुन या मुलाचे प्रेत खडकवाडी परिसरातील मांडओहळ धरणाच्या पाईप लाईनच्या कोरड्या कालव्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जावेद सुरतने (रा.सायखेडा,ता.संग्रामपूर,जि.बुलढाणा) यास पोलिसांनी अटक केली आहे. जावेद त्याच्या पतीसह खडकवाडी (ता.पारनेर) येथील सचिन सोनबा ढोकळे यांच्या पोल्ट्री फॉर्मवर मजूर म्हणून कामास होते.याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अनर्ष खेळण्यासाठी घरातून बाहेर गेल्याच्या कांगावा वडिल जावेद सुरतने यांनी केला होता. गुरुवारी सकाळी त्याचा शोध घेतला असता पोल्ट्री फॉर्मजवळच असलेल्या मांडओहळ धरणाच्या १५ फूट खोल असलेल्या पाईप लाईनच्या कालव्यात चिमुकल्याचा मृत्यूदेह सापडला होता. त्यानंतर उत्तरीय तपासणी साठी मृतदेह अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. तपासणी अंती त्याचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.दीड महिन्यापासून जावेद सुरतने (रा.सायखेडा,ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा) हे त्यांच्या पत्नीसह खडकवाडी(ता.पारनेर) येथील सचिन सोनबा ढोकळे यांच्या पोल्ट्री फॉर्मवर मजूर म्हणून कामाला आले होते. चिमुकल्याला शाळेत पाठवायचे होते. शाळेत नाव कोणाचे टाकायचे हा प्रश्न जावेदसमोर पडला होता. त्यामुळे हा मुलगा आपल्या संसारातच नको असा विचार करून जावेदने चिमुकल्याची जीवन यात्रा संपून टाकली.पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक भोसले, संतोष शेळके, निवृत्ती साळवे, शरद पवार करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर