शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 17:35 IST

राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे (वय-८५) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.

अहमदनगर : राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे (वय-८५) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांचे आज पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुलगी असा परिवार आहे.शिवाजीराव नागवडे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. १९७० साली त्यांनी ढोकराईच्या माळरानावर नगर दक्षिणमधील पहिला सहकारी साखर कारखान्याची मुहर्तमढ रोवली. १९७८ आणि १९९५ साली श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदिप शिक्षण संस्था व तुळजाभवानी शिक्षण संस्था सुरु केल्या. या शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील गावागावात शिक्षणाचे जाळे उभे केले. ते राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष होते. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, स्व. विलासराव देशमुख, वसंतदादा पाटील, शंकरराव कोल्हे, शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा