शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली: राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 18:14 IST

नागपूर पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विदर्भासह राज्यातील अनेक मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. पण भाजप-शिवसेनेच्या राज्य सरकारने पुन्हा एकदा त्याच घोषणा, तीच जुमलेबाजी करून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडाला फक्त पाने पुसली.

शिर्डी: नागपूर पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विदर्भासह राज्यातील अनेक मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. पण भाजप-शिवसेनेच्या राज्य सरकारने पुन्हा एकदा त्याच घोषणा, तीच जुमलेबाजी करून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडाला फक्त पाने पुसली.नागपूर आधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, या अधिवेशनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी होत असल्याकडे आम्ही सरकारचे लक्ष वेधले. पण सरकार त्याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे या पुतळ्याबाबत सरकारची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आहे.मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणाबाबतही आम्ही सरकारला जाब विचारला. पण सरकार याबाबतही स्पष्ट आश्वासन देऊ शकले नाही. शेतक-यांचे प्रश्न प्रामुख्याने बोंडअळी, मावा, तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांची समस्या आम्ही सरकारसमोर मांडली. पण सरकार त्यांना तातडीने ठोस दिलासा देऊ शकले नाही. पीक विम्यामध्ये फक्त कंपन्या नफा कमावतात, पण लाखो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. याबाबत देखील सरकारची भूमिका संदिग्ध होती.विरोधी पक्षांनी नवी मुंबईतील सिडकोचा घोटाळा उपस्थित केला. सरतेशेवटी सरकारला त्या भूखंडाच्या व्यवहारांवर स्थगिती आणावी लागली. मुंबईच्या नवीन विकास आराखड्यामुळे केवळ बिल्डरांचे कसे भले होईल, याबाबतही अधिवेशनात आम्ही सविस्तर भूमिका मांडली. विरोधी पक्षांनी राज्यातील अनेक प्रश्न लावून धरले असताना दुदैर्वाने सरकार मात्र गंभीर दिसले नाही. विदभार्साठी सरकारकडून २२ हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करीत असल्याचा आव आणला. पण यातील १३.५ हजार कोटी रुपये तर केंद्राचेच आहे. त्यामुळे यातून विदर्भाच्या हाती काहीही पडणार नाही.नागपूरला अधिवेशन घेण्यासाठी सरकारने प्रचंड आटापिटा केला. पण हे अधिवेशन जनतेच्या दृष्टीने निराशाजनक ठरले. पुढील अधिवेशन मुंबईला घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खरिपाच्या हंगामानंतर हिवाळी अधिवेशनात निघणारे शेतकºयांचे मोर्चे टाळण्यासाठी म्हणून सरकारने हा खटाटोप केला आहे. त्या आंदोलनांना सामोरे जाण्याची सरकारची हिंमत राहिलेली नाही. सरकार कितीही पळ काढू पाहत असेल, वेळकाढूपणा करत असेल तरी आमच्या जनतेच्या प्रश्नांना सरकारला उत्तर द्यावेच लागेल.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील