लोकमत न्यूज नेटवर्कअहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी येथे उद्या (दि. ६ मे) होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळ बैठक दीड तास चालणार असून यासाठी ‘जर्मन हँगर’ प्रकारचा मंडप उभारण्यात आला.
मंत्री, विविध विभागांचे सचिव, आमदार यांच्यासाठी वातानुकूलित विविध कक्ष उभारले आहेत. साडेतीन हजार खुर्च्याची व्यवस्था केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार भरगच्च निधीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला संवर्धन, पेडगाव किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक, तसेच जिल्ह्याच्या औद्योगिक विकास आराखड्याला मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळाला नगरी भोजनाचा पाहुणचारमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, सचिव यांच्यासह सहाशे व्हीव्हीआयपींच्या भोजनाची व्यवस्था बचत गटातील महिलांकडे देण्यात आली आहे.यात अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले १५-२० विविध पदार्थ बनवले जाणार आहेत. त्यात शिपी आमटी, आमरस, शेंगोळे, थालीपीठ, वांग्याचे भरीत, डाळबट्टी, दही धपाटे आदी पदार्थांचा समावेश असून मंत्री, आमदार आणि सचिवासांठी चांगलीच मेजवानी ठरणार आहे.