शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दीपोत्सवाला प्रारंभ

By admin | Updated: October 21, 2014 00:59 IST

अहमदनगर : ‘दिन दिन दिवाळी... गाई म्हशी ओवाळी’अशा आनंद आणि प्रकाशाच्या उत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. गोरज मुहूर्तावर गाय-वासराचे पूजन करून

अहमदनगर : ‘दिन दिन दिवाळी... गाई म्हशी ओवाळी’अशा आनंद आणि प्रकाशाच्या उत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. गोरज मुहूर्तावर गाय-वासराचे पूजन करून घरोघरी दीपोत्सव झाला. वसुबारस ते भाऊबीज अशी सहा दिवस दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीखरेदीसाठी ग्राहकांची सोमवारी बाजारात झुंबड उडाली होती.दिवाळीचा सण जसा प्रकाशाचा आहे, तसाच लक्ष्मीपूजनाचा म्हणूनच जास्त ओळखला जातो. दिवाळीतील सहाही दिवसांचे महत्त्व लक्ष्मीपूजेशी निगडित आहे. गोवत्स द्वादशीला गोवत्स (गाय आणि वासरु) पूजन झाले. गाय ही लक्ष्मी,समृद्धीचे प्रतीक आहे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूने गायीचे पाडसासह पूजन केले जाते. शेतकरी वर्गात हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. महिलांनी गायीच्या पायावर पाणी घालून पूजन केले. पंचारतीने गायींना ओवाळले. पारंपरिक पद्धतीने गायीला पुरणपोळी खाऊ घातली. मुला-बाळांना आरोग्य लाभावे,अशी प्रार्थना करून घरोघरी पणत्या प्रकाशमान झाल्या. गोवत्स द्वादशीने सहा दिवसांच्या दिवाळीला प्रारंभ झाल्याने शहरात चैतन्य संचारले. घरोघरी आकाशकंदील, विद्युत रोषणाई करण्यात आली. विद्युत रोषणाईच्या लखलखाटाने शहर उजळले आहे. पणत्या, विद्युत माळा, आकाशकंदील, रांगोळ््या खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी) धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. या दिनाचे आधुनिक महत्त्व स्पष्ट करताना येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत कोर्टीकर म्हणाले, धन्वंतरी देवता विष्णुरुप आहे. या देवतेच्या हाती अमृतकलश आहे. जगातील विकारांचा नाश करण्यासाठी या देवतेने जन्म घेतला आहे. जगात आजारी नाहीत, अशी ९० टक्के माणसे आहेत, मात्र ती अस्वस्थ आहेत. जीवनात स्वास्थ्य टिकविण्यासाठी काहीही झाले नसले तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची सुबुद्धी व्हावी, यासाठी धन्वंतरी पूजन आहे. ४मंगळवारी धनत्रयोदशी असल्याने सायंकाळी धनाची पूजा केली जाते. इंद्रदेवांनी समुद्रमंथन केले त्यावेळी लक्ष्मी प्रकट झाल्याने धनाची पूजा करण्याची प्रथा आहे.