शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

करोनासाठी खडा पहारा; नगर जिल्ह्यात तीन हजार पोलीस पोलिसबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 13:55 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी  शासनाने लागू केलेल्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा खडा पहारा आहे. जिल्ह्याची लोकसंख्या मात्र पन्नास लाखांपेक्षा जास्त आहे. विविध ठिकाणी नागरिकांना घरी बसविताना पोलिसांना नाकीनऊ येत आहे.

अहमदनगर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी  शासनाने लागू केलेल्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा खडा पहारा आहे. जिल्ह्याची लोकसंख्या मात्र पन्नास लाखांपेक्षा जास्त आहे. विविध ठिकाणी नागरिकांना घरी बसविताना पोलिसांना नाकीनऊ येत आहे.जिल्ह्यात सध्या अधिकारी अणि कर्मचारी असे एकूण ३ हजार २५० पोलिसबळ नियुक्तीस आहे़. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमाबंदी आणि संचारबंदी करण्यात आली आहे तसेच रस्त्यावर वाहने आणण्यासही बंदी आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मात्र नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.  पोलिसांसह  होमगार्डही तैनात करण्यात आलेले आहेत.१४ ठिकाणी जिल्ह्याची सीमा बंदबाहेरील जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात कोणी येऊ नये यासाठी बीड, सोलापूर, नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यांना जोडणा-या १४ ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी २४  तास पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाºया वाहनांना सोडण्यात येत आहे.पोलिसांची खेडोपाडी पेट्रोलिंगजिल्ह्यात अनेक ठिकाणी खेडोपाडी सकाळी व सायंकाळी मोठी गर्दी होत आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करून नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करीत आहे.बाहेरील कुमक नाहीकोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात पोलीस बळ देण्यात आलेले नाही. संपूर्ण देशभरात एकसारखीच परिस्थिती असल्याने स्थानिक ठिकाणी आहे. त्या पोलीस बळावरच अंमलबजावणी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या