शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे बे्रक निकामी, स्टेअरिंगही झाली लॉक; द-याची वाडीमध्ये बसला अपघात, १४ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 16:27 IST

साम्रद -अकोले या एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंगही लॉक झाल्यामुळे झालेल्या अपघातात चालकासह १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील भंडारदरा-राजूर रस्त्यावरील द-याची वाडी जवळ घडली.

राजूर : साम्रद -अकोले या एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंगही लॉक झाल्यामुळे झालेल्या अपघातात चालकासह १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील भंडारदरा-राजूर रस्त्यावरील द-याची वाडी जवळ घडली.अकोले आगाराची बस साम्रद येथे मुक्कामासाठी बुधवारी रात्री आलेली होती. ही गाडी सकाळी साडे सहा वाजता साम्रद येथून निघाली. प्रवासी घेत ही बस द-याची वाडी जवळ आली असता बसचे ब्रेक निकामी झाले तर स्टेअरिंगही लॉक झाले. त्यामुळे मोठा खडखड आवाज होऊन बसचा वेगही वाढला. त्यावेळी बस चालक अशोक इदे यांनी प्रसंगावधान राखत स्टेअरिंगवरील ताबा सोडला नाही. काही वेळातच ही बस चढणीवर एका झाडाला जाऊन धडकली. यात बसमधील १४ प्रवासी जखमी झाले.बसमधील संतोष सोडनर व एकनाथ भांगरे यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्ण वाहिका बोलावली. जखमींना घेऊन तातडीने त्यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक अशोक ईदे व अलका काळु भांगरे या दोन जखमींना धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बच्चू तुळशिराम पोकळे (वय ३०), पंढरीनाथ भिमा धिंदले (२४), ढवळा देऊ पोकळे (वय ५०), प्रकाश सोमा खडके (वय ४२), निंबा देऊ पोकळे (वय ४५, सर्व रा. शिंगणवाडी), तुकाराम खिलाजी घोगरे (वय ४५, रा. पाचनई), पांडुरंग तुकाराम सोडणर (वय ६०, रा. घाटघर), चंदर उल्हा उघडे (वय ५०) व हिराबाई बाळू उघडे (वय २५, दोघेही रा. पांजरे), कोंडाजी नारायण साळवे (वय ६०, रा. भंडारदरा कॉलनी), वंदना कोडांजी खाडे (वय २२, रा. भंडारदरा), चिंधू कावजी भांगरे (वय ६५ रा. मुरशेत) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. धोत्रे व त्यांच्या सहकारी कर्मचा-यांनी उपचार केले.घटनेचे वृत्त समजताच आमदार वैभव पिचड यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. डॉ. धोत्रे यांच्याशी चर्चा करत धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयाच्या व्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून रुग्णाची काळजी घेण्याबाबत सूचना केली. शिवसेनेचे सतिष भांगरे यांनीही रुग्णांची भेट घेऊन चौकशी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले