श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणुक २७ जानेवारी रोजी होत असून आज प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत. आरोप-प्रत्यारोपामुळे शिगेल्या पोहचलेल्या उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, तर भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार सुरेश धस यांची सांगता सभा होणार आहे. या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या तुलनेत अपक्ष व संभाजी ब्रिगेड सेना उमेदवारांनी तोडीस तोड प्रचार यंत्रणा राबविली आहे.
श्रीगोंदा नगरपरिषद : उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:00 IST