शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

श्रीगोंदा शहरात दुपारपर्यंत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 20:04 IST

श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.शनिवारी सकाळी दहा वाजता भुजबळ समर्थकांनी शनिचौकात एकत्र जमून निषेध सभा घेतली. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ८ जून रोजी पहाटे तपासादरम्यान कोसेगव्हाणचे माजी उपसरपंच भीमराव नलगे यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.  त्यामुळे महावीर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी नानासाहेब कोंथिबीरे, एम़ डी़ शिंदे, गोरख आळेकर, सुमीत बोरुडे, पोपट खेतमाळीस यांनी केली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोवार म्हणाले, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने महावीर जाधव यांना पंधरा दिवस सक्तीच्या रजेवर पाठवले असून, या प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. पोवार यांच्या आश्वासनानंतर बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले आणि शहराची बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.वादाची ठिणगी पडली व विझलीमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पंधरा दिवस सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यामुळे शहर बंद करणे बरोबर नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रा. तुकाराम दरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती़ त्यावर भुजबळ समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाहेरच्या माणसांनी आमच्यात ढवळाढवळ करू नये, अशा पोस्टही फिरू लागल्या. त्यावर प्रा. दरेकर हे चांगलेच संतप्त झाले़ बाहेर गावातून शहरात स्थानिक झालेल्या नागरिकांचे ५० टक्के मतदान आहे. त्यामुळे आम्ही जनहिताचे मत मांडले. यामध्ये काय गैर, असा सवाल त्यांनी केला़ त्यानंतर या वादावर पडदा पडला. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा