शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या आजारावर मात करून श्रीगोंद्याच्या गणेश बायकरने पटकावले ब्राँझपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:55 IST

गुवाहाटी (आसामा) येथे सोमवारी खेलो इंडिया वेटलिफ्टींग स्पर्धा पार पडल्या. यात श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील गणेश बायकर याने डेंग्यूच्या आजारावर मात करुन ७३ किलो वजनगटात सुमारे २५० किलो वजन उचलून बाँझपदक पटकविले.

बाळासाहेब काकडे /  श्रीगोंदा  : गुवाहाटी (आसामा) येथे सोमवारी खेलो इंडिया वेटलिफ्टींग स्पर्धा पार पडल्या. यात श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील गणेश बायकर याने डेंग्यूच्या आजारावर मात करुन ७३ किलो वजनगटात सुमारे २५० किलो वजन उचलून बाँझपदक पटकविले. गणेश बायकर हा वडाळी येथील शेतकरी दिंगाबर व नंदाबाई बायकर याचा मुलगा आहे. गणेशाचे प्राथमिक शिक्षक वडाळी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयात झाले. सध्या तो लोणी काळभोर येथील गणपतराव काळभोर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गणेशला व्यायामाचा विशेष छंद होता. दहावीत असताना दूरचित्रवाहिनीवर वेटलिफ्टींगची स्पर्धा पाहिली आणि गणेश वेटलिफ्टींग खेळाच्या प्रेमात पडला. राज्यपातळीवर त्याने तीन सुवर्णपदके मिळविली आहेत. तर राष्ट्रीय पातळीवर यश त्याला हुलकावणी देत होते. पण उज्ज्वला माने यांनी वेटलिफ्टींगचे त्याला चांगले धडे दिले. त्यान राज्यपातळीवर सुवर्णपदक मिळविले आणि खेलो इंडियात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या महिन्यात गणेशला डेंग्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एक महिनाभर आराम करण्याचा सल्ला दिला. पण गणेशने आराम न करता आपले ध्येय गाठण्यासाठी वेटलिफ्टींगचा सराव सुरू ठेवून खेलो इंडियाच्या मैदानात उतरला. स्नॅचमध्ये ११० तर जर्कमध्ये १४० किलो वजन उचलले आणि बाँझपदकावर नाव कोरले. खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंडने पदकाची हॅटट्रिक केली आहे. तर गणेश बायकरने वेटलिफ्टींगमध्ये बाँझपदक पटकविले. त्यामुळे खेलो इंडियात श्रीगोंद्याला चौथै पदक मिळाले आहे. गणेशला गेल्या महिन्यात डेंग्यू झाला. आम्ही खेळू नको म्हणत होतो. गणेश खेळला आणि पदक मिळविले. आता गणेशसाठी जमीन विकू. पण माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया गणेशच्या आई, वडिलांनी व्यक्त केली. 

मी काय खेळतोय तालुक्यात माहीत नव्हते. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने काम करीत असलेल्या अग्नीपंख फौंडेशनने माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारून प्रोत्साहन दिले. खेलो इंडिया वेटलिफ्टींगमध्ये बाँझपदक मिळाले. आला कॉमन वेल्थ गेम टार्गेट राहणार आहे, असे वेटलिफ्टींग खेळाडू गणेश बायकर यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKhelo Indiaखेलो इंडियाShrigondaश्रीगोंदा