शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

श्रीरामपूर प्रांतचा गतिमान कारभार

By admin | Updated: August 28, 2023 17:10 IST

राज्य सरकारने २००२ पासून सुरू केलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व स्पर्धेत श्रीरामपूरच्या प्रांताधिकारी कार्यालयाने नाशिक महसूल विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला.

 श्रीरामपूर : राज्य सरकारने २००२ पासून सुरू केलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व स्पर्धेत श्रीरामपूरच्या प्रांताधिकारी कार्यालयाने नाशिक महसूल विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते प्रांताधिकारी प्रकाश थविल यांना प्रशस्तीपत्रक व रोख ३० हजार रूपये देऊन गौरविण्यात आले. कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे व सांघिक कामगिरीचा हा गौरव असल्याचे थविल यांनी सांगितले. अभियान कालावधीत १५३ शिबिरांच्या माध्यमातून ५६ हजार ७८८ दाखले देण्यात आले. ४३ शीव रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून ७३ किलोमीटरचे रस्ते अतिक्रमणमुक्त करून शेतकर्‍यांना शेती कामासाठी खुले करून देण्यात आले. उपविभागातील १५२ गावांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम घेऊन १२ हजार १३४ हरकती, आक्षेपांची निर्गती करण्यात आली. फेरफार अदालतींच्या माध्यमातून ४ हजार ९४२ फेरफारांची नोंद करण्यात आली. महसूल अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात ४७ तंट्यांची सोडवणूक झाली. निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टानुसार सलग दोन वर्षात १०० टक्के महसूल वसुली पूर्ण करण्यात आले. शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत दिघी हे गाव दत्तक घेऊन या गावात वृक्ष लागवड करण्यात आली. या गावाशी संबंधित दिघी ते गोंधवणी, दिघी ते खंडाळा व दिघी ते निमगावखैरी या अतिक्रमित शीव रस्त्यांची अतिक्रमणे दूर करुन रस्ते खुले करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांना शिधापत्रिका, उत्पन्नांचे दाखले, रहिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी) सुहास मापारींनाही श्रेय थविल यांच्यापूर्वी असलेले तत्कालीन प्रांताधिकारी सुहास मापारी यांनी गाव पातळीवरील तलाठी, कर्मचार्‍यांना गाव पातळीवर काम करणे सुलभ होण्यासाठी ‘राजसारथी’ महसूल दैनंदिनी तयार करून उपलब्ध करुन दिली. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. कार्यालयातील संगणक साक्षर बनवून त्यांना स्वतंत्र संगणक, इंटरनेट, इंटरकॉम सुविधा पुरविण्यात आल्या. मापारी यांच्या कारकिर्दीत कमी कालावधीत जलदगतीने मोठ्या प्रमाणात कामे होऊन आतापर्यंतचे पहिली वहिले महसूल लोकन्यायालय भरवून एका दिवसात महसूलचे ४७ खटले निकाली काढण्यात आले. त्यामुळे सन २०१३ मधील मापारींच्या कारकिर्दीत झालेल्या कामाची दखल घेऊन नाशिक विभागात हे कार्यालय ‘प्रगती’ अभियानात द्वितीय आल्याने या पुरस्काराचे श्रेय त्यांना जात आहे. विद्यमान थविल यांनी जुन्या कामांना चालना दिली.