शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण जिल्ह्याच्या दूध संकलनात वाढ

By admin | Updated: June 16, 2014 00:11 IST

अहमदनगर : जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या दुधाच्या संकलनात गतवर्षीच्या तुलनेत २ लाख ८२ हजार लीटरने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यात संगमनेर आणि कोपरगाव

अहमदनगर : जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या दुधाच्या संकलनात गतवर्षीच्या तुलनेत २ लाख ८२ हजार लीटरने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यात संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यात मात्र, दुधाचे संकलन घटलेले आहे. तर दक्षिण जिल्ह्यात सर्व तालुक्यात दुधाच्या संकलनात वाढ झालेली दिसत आहे.जिल्हा दूधव्यवसाय अधिकारी यांच्या कार्यालयाकडील माहितीनुसार जिल्ह्यात गत वर्षी मे महिन्याच्या तुलनेत यंदा दूध संकलनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जिल्ह्यात २० लाख २३ हजार ८८७ लीटर दुधाचे संकलन झाले होते. यंदा त्यात वाढ होऊन २३ लाख ६ हजार ५८० लीटरपर्यंत दुधाचे संकलन झालेले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात सर्वाधिक दुधाचे उत्पादन असणाऱ्या संगमनेर आणि कोपरगाव तालुका वगळता अन्यत्र भरघोस वाढ दिसत आहे. यात सर्वाधिक वाढ राहुरी तालुक्यात ५० हजार लीटरहून अधिक झालेली आहे. तर श्रीगोंदा ४९ हजार लीटर, पारनेर ४८ हजार लीटर, पाथर्डी सारख्या दुष्काळी तालुक्यातून ४७ हजार लीटर, कर्जत ४४ हजार आणि नेवासा ३२ हजार लीटर असे दुधाचे संकलन झालेले आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्याकाळात सर्वाधिक पाण्याचे टँकर जिल्ह्यात सुरू होते. हिरव्या चाऱ्या सोबतच सुक्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. याचा फटका दूध व्यवसायाला बसला आणि दुधाच्या उत्पादनात घट आली होती. विशेष म्हणजे या काळातही संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यातील दुधाचे उत्पादन घटले नव्हते. यंदा उन्हाळ्यात बऱ्यापैकी चारा उपलब्ध होता. खरीप आणि रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध झाल्याने दूध उत्पादन टिकून राहिले. (प्रतिनिधी)

तालुकानिहाय दुधाचे संकलन लीटरमध्ये ( गतवर्षीचे) अकोले १ लाख ९ हजार ५६३ (१ लाख ९ हजार ६१६), संगमनेर ३ लाख ८१ हजार (४ लाख ४९ हजार ३५६), कोपरगाव १ लाख ४१ हजार ४५३ ( १ लाख २१ हजार ८२), राहाता २ लाख ५८ हजार २०५ ( २ लाख ३३ हजार २०२), श्रीरामपूर १ लाख १९ हजार १४९ (९२ हजार २४७), नेवासा १ लाख ३० हजार ५०० (९८ हजार २४५), शेवगाव ३१ हजार ५०० ( २२ हजार ९००), पाथर्डी ९६ हजार ७२७ (४८ हजार ७८४), नगर १ लाख ५७ हजार ५४८ ( १ लाख ७९ हजार २१८), राहुरी ३ लाख १९ हजार १९६ (२ लाख ६५ हजार १९५), पारनेर २ लाख ४२ हजार १५४ (१ लाख ९३ हजार ३५८), श्रीगोंदा १ लाख ६७ हजार १९५ (१ लाख १७ हजार ७७४), कर्जत १ लाख २७ हजार ७०० (८३ हजार १००), जामखेड २२ हजार ८०० (१० हजार ४५०) असा आहे.