शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी पाठ फिरवताच धान्य घेण्यासाठी उसळली गर्दी, तळीरामांमुळे डिस्टिन्संगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 19:17 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील एका गावामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वतीने गरजूंना धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रातिनिधीक धान्य देऊन खासदारांनी प्रस्थान करताच धान्याच्या पिशव्या घेण्यासाठी एकच गर्दी उसळली. 

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील एका गावामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वतीने गरजूंना धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रातिनिधीक धान्य देऊन खासदारांनी प्रस्थान करताच धान्याच्या पिशव्या घेण्यासाठी एकच गर्दी उसळली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांनी कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या जनतेला धान्य वाटप करीत आहेत. खासदारांच्या तालुक्यातील यंत्रणेने गरजवंतांची सविस्तर यादी तयार केली. नियोजनाप्रमाणे खासदार विखे आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह कार्यकर्त्यांचा ताफा आढळगाव या गावात पोहोचला. फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत प्रातिनिधिक स्वरूपात खासदार विखे यांनी धान्य वाटप केले आणि ते पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यांची पाठ फिरताच जमलेल्या लोकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडला. धान्य बॅग मिळविण्यासाठी एकच गोंधळ उडाला. नियोजन केलेल्या लोकांना धान्य मिळण्याऐवजी भलत्यांनीच बॅगा घेऊन पळ काढला. १७५ गरजवंतांना धान्य वाटपाचे नियोजन असताना २२५ पेक्षा जास्त व्यक्तींनी गर्दी केली. त्यामुळे मान्यवरांनी कार्यक्रमस्थळ सोडल्याची चर्चा आहे. या सर्व गोंधळाला आवरण्याचा प्रयत्न करणाºया एका माजी पदाधिकाºयाच्या अंगावर एक तळीराम धावून गेला. वंचित राहिलेल्यांनाही धान्य मिळेल त्यासाठी पुन्हा नियोजन करण्याचे खासदारांची यंत्रणा सांगत होती. परंतु, गोंधळ करणारे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरfoodअन्न