महाविद्यालयाकडून तिने सोनेवाडी गावात भेट दिली. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी तिचे स्वागत केले. तिने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान व आधुनिक शेतीची माहिती दिली. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षणसंस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय, लोणी येथे वैष्णवी सुंबे ही विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. संस्थेचे कृषी शिक्षण संचालक भारत घोगरे, प्राचार्य नीलेश दळे, कार्यक्रम समन्वयक प्रा. रमेश जाधव, कार्यक्रमाधिकारी प्रा. आर. ए. दसपुते, प्रा. प्रियंका दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्येने सोनेवाडी येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच स्वाती दिलीप सुंबे, योगेश सुंबे, सुवर्णा सुंबे, अभिषेक सुंबे, साहिल लांडे, महेश देवकर, अभिषेक राऊत, शिवम सुंबे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
------------
फोटो - १६कृषीकन्या
नगर तालुक्यातील सोनेवाडी येथे कृषिकन्या वैष्णवी सुंबे हिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.