शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

काष्टीतील सोनाली देतेय मृत्यूशी झुंज; वडील, चुलतेही झाले किडनीच्या आजाराचे शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:34 IST

सोनाली कोकाटे ही काष्टी येथील रहिवासी. तिचे वडील, चुलते, आत्या हे सर्व किडनी आजाराच्या शिकार झाले. या किडनीच्या आजाराने सर्व कुटुंबालाच गिळले असताना आता मागे राहिलेल्या सोनाली कोकाटे हिलाही या आजाराने विळखा घातला आहे.

बाळासाहेब काकडेकाष्टी : सोनाली कोकाटे ही काष्टी येथील रहिवासी. तिचे वडील, चुलते, आत्या हे सर्व किडनी आजाराच्या शिकार झाले. या किडनीच्या आजाराने सर्व कुटुंबालाच गिळले असताना आता मागे राहिलेल्या सोनाली कोकाटे हिलाही या आजाराने विळखा घातला आहे. आता महाविद्यालयीन शिक्षण घेऊन झेप घेण्याच्या तयारीत असलेल्या काष्टी येथील सोनाली रंगनाथ कोकाटे हिला गेल्या दीड वर्षापासून किडनी आजाराने ग्रासले आहे. दोन्ही किडन्या निकाम्या झाल्याने सोनालीवर औरंगाबाद येथील एका खासगी हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत. उपचारासाठी किडनी ट्रान्स्फरसाठी किमान सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.घरात आई असून, चौथीत शिकणारा भाऊ आहे. सोनाली महाविद्यालय सोडून दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे कोकाटे कुटुंबासमोर अडचणी आणि आव्हानाचा डोंगरच उभा राहिला आहे. सोनाली ही श्रीगोंदा येथील जिवाजीराव कॉलेजमध्ये एस.वाय.बीए मध्ये शिक्षण घेणारी अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे. तिची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. मात्र कुटुंबात कमविणारे कोणी नाही. जे कुटुंबाचे आधार होते, तेही जग सोडून गेल्यामुळे आधाराला आता फक्त आई आणि लहान भाऊ आहे. काष्टी येथील सिद्धिविनायक बचत गटातील मानवतावादी भावनेतून सोनालीला दत्तात्रय पाचपुते, डॉ. संजय कोकाटे, आजिनाथ कोकाटे, डॉ. संदीप कोकाटे, प्रमोद शिंदे, मारुती कोकाटे, सुनील कोकाटे, नवनाथ कोकाटे, शांताराम कोकाटे, नितीन कोकाटे, डॉ. विजय ठुबे यांनी एकत्र येऊन सुमारे १८ हजारांची मदत केली आहे. तिला आणखी मदतीची गरज आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा