शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजूरमध्ये जपला जातोय सामाजिक एकोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 15:45 IST

राजूरमध्ये गेल्या पाच दशकाहून अधिक काळापासून सामाजिक एकोपा जपला जात आहे. हिंदू आणि मुस्लिम सलोख्याने एकमेकांचे सण मोठ्या आनंदात साजरे करतात.  हिंदूचा गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असू दे की मुस्लिमांचा मोहरम, ईद किंवा उरूस या सर्वच उत्सवातून राजूर येथील राम रहीम तरुण मित्र मंडळ  ऐक्य जपत आहे.

प्रकाश महालेराजूर : अकोले तालुक्यातील राजूरमध्ये गेल्या पाच दशकाहून अधिक काळापासून सामाजिक एकोपा जपला जात आहे. हिंदू आणि मुस्लिम सलोख्याने एकमेकांचे सण मोठ्या आनंदात साजरे करतात.  हिंदूचा गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असू दे की मुस्लिमांचा मोहरम, ईद किंवा उरूस या सर्वच उत्सवातून राजूर येथील राम रहीम तरुण मित्र मंडळ  ऐक्य जपत आहे.राजूर येथे विविध जाती धर्माचे लोक राहतात. स्थानिकांबरोबर नोकरी निमित्ताने रहिवासी झालेल्यांची संख्याही आता अधिक झाली आहे.  सर्वच धर्माचे लोक आपले सण उत्सव आपापल्या परीने साजरे करतात. खाटीक गल्लीतील राम रहीम तरुण मित्र मंडळाने आपली आगळी वेगळी परंपरा अद्यापही सुरूच ठेवली आहे.    हिंदूंचा गणेशोत्सव असो की मुस्लिमांचा उरूस यावेळी निघणाºया मंडळाच्या मिरवणूक रथावर भगव्या बरोबर हिरवा झेंडाही फडकत असतो. आजही गणेशमूर्तीची स्थापना केलेल्या हॉलच्या दरवाज्यावर हे दोन्ही झेंडे फडकत आहेत. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात जेवढी संख्या हिंदू तरुणांची तेव्हढीच मुस्लिम समाजाची.गणेशोत्सवासाठी या गल्लीतील मुस्लिम समाज तर उरुसच्या संदल मिरवणुकीसाठी गल्लीतील हिंदू समाज बांधव स्वइच्छेने ठरणारी वर्गणी वा देणगी देण्यात मागे हटत नाहीत. दोन्ही वेळच्या आरतीस सर्वच एकत्र येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भांगरे व जिशान खाटीक यांनी सांगितले. विकी मुतडक, जावेद खाटीक, सचिन शेंडे, नौशाद खाटीक, स्वप्निल कानकाटे, अंकुश सुकटे व इतर सर्वच मंडळातील तरुणाई उत्स्फूर्तपणे कार्यक्रम पार पाडतात. हम सब एक है चा नारा देतात.        पन्नास वर्षांपासून सुरू आहे परंपराआम्ही लहान असतानाही या कार्यक्रमांचा कार्यक्रमांचा आनंद घ्यायचो. त्यामुळे मागील पन्नास वर्षांहून अधिक काळाची परंपरा तरुणाईने पुढेही सुरू ठेवली आहे. त्यामुळे कुठल्याही उत्सवात गल्लीत वाद होत नाहीत व एकोपा टिकून असल्याचे राम रहीम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जगदाळे यांनी सांगितले़ 

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Rajur ghatराजूर घाट