शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

..तर घराजवळ फिरकणार नाही बिबट्या, अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 09:54 IST

Leopard: बिबट्याची धास्ती नाही असा राज्यात एकही जिल्हा नाही. रात्री-अपरात्री बेसावध असताना बिबट्यांचे हल्ले होत आहेत.

- प्रमोद आहेर शिर्डी (जि. अहमदनगर) -बिबट्याची धास्ती नाही असा राज्यात एकही जिल्हा नाही. रात्री-अपरात्री बेसावध असताना बिबट्यांचे हल्ले होत आहेत. त्यापासून संरक्षण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या औषधाची मात्रा वापरण्यात येणार असून त्या औषधाचा वास येताच बिबट्याच काय कोणताही वन्यप्राणी जवळ न येता पळून जाईल, सुमारे ४५ दिवस या औषधाचा वास टिकून राहील, विशेष म्हणजे हे सुरक्षित आहे, असा दावा हे औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने केला आहे.  

धोका नाहीपुण्यातील मे. पेस्टोसिस एल. एल. पी. या कंपनीने बिबट्यांपासून संरक्षणासाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये बिबट्यांना प्रतिर्षित करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. या औषधापासून बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांना कोणताही धोका होत नाही. या औषधाच्या वासाने बिबट्यांना विशिष्ट प्रकारची संवेदना मिळून ते त्या भागातून दूर राहतात असे पेस्टोसिसचे संस्थापक अविनाश साळुंके यांनी सांगितले़.

वन्यप्राणी जवळ येत नसल्याचा दावाया औषधामुळे वन्यप्राणी घरे आणि शेताच्या परिसरापासून दूर राहतात. निर्जन व जंगलातून जाताना एखाद्या व्यक्तीने या औषधाचा आपल्या कपड्यांवर अत्तरासारखा वापर केला तर वन्यप्राणी त्याच्याजवळ येत नाहीत, असा दावा अविनाश साळुंके यांनी केला आहे. 

प्रयोगासाठी शासनाने दिली अनुमती- हे एक बिनविषारी आणि वासावर आधारित तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर माकड, डुक्कर, उंदीर, साप, पक्षी आणि रानटी पशू यांसारख्या वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. या पद्धतीचा वापर आधीच रायगड, अमरावती, रत्नागिरी या जिल्ह्यांसह हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये डुक्कर, माकड अशा वन्यजीवांसाठी करण्यात आला आहे.- जिल्ह्यातही वन्यजीवांचा उपद्रव कमी करण्यासाठी पेस्टोसिसला हा पथदर्शी प्रयोग करण्यासाठी शासनाने अनुमती दिली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याAhmednagarअहमदनगर