शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रात मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:56 IST

मुळा नदीपात्रात सध्या मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळू उपसण्याची धडपड सुरू आहे. नदीपात्रातील पाण्यात बुड्या मारून रोजंदारीवर मजूर वाळू बाहेर काढीत आहेत़ पाण्यातून बाहेर काढलेली वाळू काठावर टाकण्याची जबाबदारी महिलांवर असल्याचे चित्र आहे. येथे चार मजुरांना एका वाहनापोटी दोन ते अडीच हजार रुपये मिळत आहेत.

भाऊसाहेब येवलेराहुरी : मुळा नदीपात्रात सध्या मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळू उपसण्याची धडपड सुरू आहे. नदीपात्रातील पाण्यात बुड्या मारून रोजंदारीवर मजूर वाळू बाहेर काढीत आहेत़ पाण्यातून बाहेर काढलेली वाळू काठावर टाकण्याची जबाबदारी महिलांवर असल्याचे चित्र आहे. येथे चार मजुरांना एका वाहनापोटी दोन ते अडीच हजार रुपये मिळत आहेत.गेल्या साडेतीन दशकांपासून मुळा नदीपात्रातून वाळूची वाहतूक सुरू आहे़ वाळूच्या उपशामुळे नदीचे पात्र २५ फूट खोल गेले आहे़ वाळू संपण्याच्या मार्गावर असताना मिळेल तेथून वाळू काढण्यासाठी मजुरांची धडपड सुरू आहे़ वाळू उचलेगिरीवर सर्वजण टीका करीत असले, तरी त्यामध्ये पोटाची खळगी भरणारे मजूर खरे कष्टाळू आहेत़ ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता वाळू उचलण्याचे काम केले जात आहे़ त्यामध्ये आता महिलाही पुढे सरसावल्या आहेत़दोन पुरुष व दोन महिला मिळून एक टेम्पोभर वाळू उपसा करतात़ हे काम नदीपात्रात ठिकठिकाणी सुरू आहे़ वाळू उचलेगिरी म्हटले, की केवळ पुरुषांची मक्तेदारी होती़ मात्र गेल्या काही दिवसांपासून महिला वाळू उचलण्यास पुढे येत आहेत़ मुळा नदीमध्ये वाळू पाण्यात आढळून येत आहे़ मध्यंतरी पाच बंधाऱ्यांसाठी नदीपात्रातून पाणी सोडण्यात आले होते़ सध्या पाणी नदीपात्राच्या अनेक खड्ड्यांत आहे़ सदरहून तळेरूपी खड्ड्यांत असलेल्या पाण्यातून वाळू बुड्या मारून काढली जातआहे़टोकरी व ताटली घेऊन मजूर पाण्यात बुड्या मारतात़ बुडी मारल्यानंतर ताटलीच्या सहाय्याने वाळू टोकरीत भरली जाते़ वाळूची टोकरी भरली की पाण्याच्या वर यायचे़ तोपर्यंत श्वास रोखून ठेवला जातो़ एकदा की पाण्याच्या बाहेर पडले की कोंडलेला श्वास घेऊन वाळू घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या हातात टोकरी दिली जाते़ टोकरी घेऊन पाण्यातून मार्ग काढीत महिला बाहेर येते़ नदीकाठच्या कडेला वाळूचा ढिग केला जातो़मजुरांकडे प्राणायामची कलापाण्यात बुडी मारून कुंभक केला जातो. त्यानंतर पाण्यातून बाहेर आल्यावर रेचक हा प्राणायमचा प्रकार करण्याची कला मजुरांकडे आहे़ पाण्यातून वाळू बाहेर काढणे व ढीग घालणे ही प्रक्रिया उन्हातान्हात सुरू असते़ दिवसभर वाळू उचलल्यानंतर एका टेम्पोत ही वाळू भरून दिली जाते़ एका टेम्पोचे चार मजुरांना दोन हजार रुपये मजुरीपोटी मिळतात. उन्हाळ्यात मुळा नदी म्हटले की खरबूज, टरबूज व काकडी यांच्या वाड्यांची रेलचेल असायची़ आता वाड्यांची जागा पान्हाडाने घेतली आहे़ नदीचे पात्र खोल गेल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे़ विहिरींचे तळ वर व नदीचे पात्र खोल अशी अवस्था निर्माण झाली आहे़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी