शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात आणखी सहा कोरोनाबाधितांना रग्णालयातून सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्याने पुन्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे. मंगळवारी तीन व आज (बुधवारी) सहा कोरोनाबाधित रूग्णांना त्यांच्या १४ दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ ८ जण रूग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी डिस्चार्ज झालेल्यांत जामखेडचे दोन व संगमनेरच्या चौघांचा समावेश आहे. दरम्यान, ४४ पैकी ३४ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्ह्याने पुन्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे. मंगळवारी तीन व आज (बुधवारी) सहा कोरोनाबाधित रूग्णांना त्यांच्या १४ दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ ८ जण रूग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी डिस्चार्ज झालेल्यांत जामखेडचे दोन व संगमनेरच्या चौघांचा समावेश आहे. दरम्यान, ४४ पैकी ३४ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.कोरोनाबाधित असलेल्या जामखेड येथील दोन आणि संगमनेर येथील चौघा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी या ६ रुग्णांची बूथ हॉस्पिटलमधून तपासणीनंतर घरी रवानगी करण्यात आली. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स, तसेच इतर आरोग्य कर्मचाºयांनी स्वागत करुन त्यांना निरोप दिला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ३४ झाली आहे.दरम्यान, या रुग्णावर उपचार करणाºया बूथ हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे आणि त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधासाठी अहोरात्र राबणाºया आरोग्य यंत्रणेचे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या यंत्रणांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतूक केले. नागरिकांनी लॉकडाऊन काळात दाखविलेल्या संयमाचे आणि सहकार्याचे सर्व मंत्रीमहोदय आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आभार मानले आहेत. आगामी काळातही सर्वांनी काळजी घेण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. एकूण ४४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी आता ८ रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यापैकी १६ व्यक्तींचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.संगमनेर येथे ४ नेपाळी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांचे पुढील दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, जामखेड येथील कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६४८ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. --