शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

हायप्रोफाईल लग्नसोहळ्यातून लांबविले सहा लाखांचे दागिने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 13:52 IST

नगर-औरंगाबाद रोडवरील एनआऱ लॉन या मंगलकार्यालयातील लग्नसोहळ्यातून चोरट्यांनी तब्बल सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. 

अहमदनगर: लग्नसराई सुरू होताच अंगावर खाजेचे औषध टाकून चो-या करणाºया परप्रांतीय टोळ्या नगर शहर व परिसरात पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजता नगर-औरंगाबाद रोडवरील एनआऱ लॉन या मंगलकार्यालयातील लग्नसोहळ्यातून चोरट्यांनी तब्बल सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या चोरीत लहान मुलाचा वापर झाल्याचे सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आले आहे.    एनआर लॉन येथे  शनिवारी सायंकाळी श्रीरामपूर येथील सराफ व्यवसायिक असलेल्या नागरे कुटुंबियांचा विवाह सोहळा होता. या सोहळ्यातील झगमगाट पाहून चोरट्यांनी चोरट्यांनी हे मंगलकार्यालय लक्ष्य केले. चोरीसाठी एका लहान मुलाला वेटरचे कपडे घालून आतमध्ये पाठविले. या मुलाने लग्नसोहळ्यातील जयश्री नागरे यांना हेरून त्यांच्या अंगावर खाजेचे औषध टाकले़ जयश्री यांचे लक्ष्य विचलित होताच मुलाने त्यांची पर्स चोरून नेली़. या पर्समध्ये ५ लाख ९८ हजार रुपयांचे दागिने होते. या चोरीच्या घटनेनंतर मंगल कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज तपासले तेंव्हा चोरी करणारा मुलगा आत येताने व नंतर पिशवी बाहेर घेऊन जाताने दिसत आहे. याप्रकरणी जयश्री यांचा मुलगा अजिंक्य दिलीप नागरे (वय २६ रा़ श्रीरामपूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक मोहन बोरसे, उपनिरिक्षक पवन सुपनर यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटिव्ही फुटेज तपासले व परिसरात चोरट्यांचा शोध सुरू केला. याप्रकरणी हेड कॉस्टेबल थोरवे हे पुढील तपास करत आहेत़. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी