शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यातील स्फोटात सहा मजूर जखमी : सुपा एमआयडीसीतील दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:22 IST

पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीमधील कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा मजूर भाजून जखमी झाले.

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीमधील कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा मजूर भाजून जखमी झाले. याबाबत मंगळवारी रात्री सायंकाळपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे सविस्तर अधिकृत माहिती मिळू शकली नाही.मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार ८ जानेवारीस सकाळी सुपा एमआयडीसीमधील शुभम एंटरप्रायझेस या कारखान्यात ही दुर्घटना घडली. या कारखान्यात टायरपासून आॅईल तयार केले जाते.टायर जाळून त्यापासून हे आॅईल काढले जाते. त्यासाठी असणाऱ्या टाकीचा स्फोट झाला. त्यामुळे तेथे काम करणारे मजूर भाजले. जखमी मजुरांना सुपा येथील खासगी दवाखान्यात तर काहींना तातडीने नगरला हलविण्यात आले.जखमींमध्ये राजाराम बबन चेडे (रा.हंगा, ता. पारनेर), कमलेश सहाणे, लालदेव सहाणे व मोहन सहाणे यांचा समावेश आहे. चेडे हंगा येथील रहिवासी असून उर्वरित मजूर महाराष्ट्राबाहेरील असल्याचे समजते. तर चंदन व राम मोहन (पूर्ण नाव माहीत नाही) या नावाच्या कामगारांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत कोणीही पोलिसात फिर्याद दिलेली नव्हती.पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता ती कंपनी बंद असून तेथे कुणीच माहीतगार उपस्थित नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुपा पोलिसांकडे यापेक्षा जास्त माहिती नव्हती. यापूर्वी सुपा एमआयडीसीत स्फोटाच्या घटना घडून परप्रांतीयांना जीव गमवावा लागला होता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर