शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिडे, एकबोटे यांना अटक करा; दलित संघटनाचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:18 IST

कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देभीमा-कोरेगाव दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी २५ लाख व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रुपये भरपाई देण्यात यावी मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी व त्यांच्या संघटनेवर कायमस्वरुपी बंद आणावीपुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी हिंसाचार रोखण्यात कुचराई केल्यामुळे त्यांना सहआरोपी करण्यात यावेमयताच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर : कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्त्व अजय साळवे व सुनील क्षेत्रे यांनी केले. मोर्चात छावा व मराठा महासंघ सहभागी होणार असून, हा मोर्चा कुठल्याही जाती विरोधात काढण्यात आलेला नाही तर कोरेगाव-भीमा प्रकरणावरुन मराठा व दलितांमध्ये फुट पडणा-या मनुवाद्यांविरोधात हा मोर्चा असल्याचे साळवे यांनी यावेळी सांगितले.

मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करावी व त्यांच्या संघटनेवर कायमस्वरुपी बंद आणावी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी हिंसाचार रोखण्यात कुचराई केल्यामुळे त्यांना सहआरोपी करण्यात यावे, हिंसाचारग्रस्त भागातील जिवीत व वित्तहानीबाबत अहवाल तयार करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी त्यासाठी ज्या इमारतींवर ही दगडफेक करण्यात आली, त्या इमारत मालकांना सहआरोपी करुन त्यांच्याकडून नुकसानभरपाईची रक्कम वसूल करावी, भीमा-कोरेगाव दुर्घटनेतील जखमींना प्रत्येकी २५ लाख व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रुपये भरपाई देण्यात यावी तसेच मयताच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चात अनंत लोखंडे, जयंत गायकवाड, नाना पटोले, सुरेश बनसोडे, रोहित आव्हाड, नितीन कसबेकर, सुनील शिंदे, सुनील क्षेत्रे, सुनील उमाप,विनोद भिंगारदिवे, पंडित वाघमारे,संतोष गायकवाड,संजय जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने दलित बांधव उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार