शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल तेली समाजाचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 20:19 IST

अहमदनगर जिल्हा सकल तेली समाजातर्फे तेलीखुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतला.

अहमदनगर : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील पाच वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करणारा व त्यास पाठिशी घालणा-या व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा सकल तेली समाजातर्फे तेलीखुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतला.दुपारी एक वाजेच्या सुमारास तेलीखुंट येथे समाजबांधव जमल्यास सुरुवात झाली. तेलीखुंटमधून निघून शहरातील मुख्य बाजारपेठांतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या व्यासपीठावर काही काळे वस्त्र परिधान केलेल्या मुलींची भाषणे झाली. तसेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व महापौर सुरेखा कदम यांनीही उपस्थितांना संबोधित केले. यावेळी संध्या मेढे, अ‍ॅड. अनुराधा येवले आदी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, पीडित मुलीवर अत्याचार करणा-यांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी पीडितेच्या वडिलांवरच दबाव आणला जात आहे. तेली समाजाचे नेते अण्णा चौधरी व महेश चौधरी यांच्या मदतीने जळगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. ही घटना सुसंस्कृत महाराष्ट्राला संतापजनक व चीड आणणारी आहे. आशा प्रवृत्तींच्या विरुद्ध कायद्यात दुरुस्ती करून अत्याचार करणा-यास फाशीची शिक्षा द्यावी.नराधमास मदत करणारे व दबाव आणणारे यांनाही सहआरोपी करावे गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा. नामांकित विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, पीडित मुलींच्या कुटुंबीयाला तातडीची मदत म्हणून ५ लाख रुपये द्यावेत, पीडित मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा व भविष्यात तिला शासकीय नोकरीची लेखी हमी द्यावी. मुलीला सर्व वैद्यकीय मदत मिळावी व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे या मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिका-यांना निवेदन देताना अंजली देवकर, अश्विनी पनके, शारदा डोळसे, श्रृती पनके, नंदिनी डोळसे, धनश्री दारूणकर, प्रणिता हुलावळे, वैष्णवी काळे आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय