राशीन : राज्यातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान व अष्टविनायक गणपतीपैकीं एक असलेले कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धीविनायक गणपतीचा जन्मोत्सव सोहळा पांरपारीक पद्धतीने भक्तीमय वातावरणामध्ये पार पडला. यावेळी हजारो गणेश भक्तांनी गणपतीचे दर्शन घेतले.या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी गणपती पदे म्हणण्यात आली. तसेच श्रीकृष्ण पुरोहित यांचे गणेश चरित्रावर कीर्तन झाले़ या कीर्तनात त्यांनी गणपती जन्मोत्सवाविषयी माहिती दिली़ यावेळी मंदिराच्या गाभा-यात हार-फुलांनी सजवलेल्या पाळण्यात गणपती मूर्ती ठेवून महिलांनी गणेश जन्माचा पाळणा म्हटला. त्यानंतर प्रदक्षिणा मार्गावर गणपतीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
सिद्धीविनायकायचा जन्म सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 14:23 IST