शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाकाहारी हॉटेलांमध्ये पहिल्या दिवशी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:59 IST

कोरोनाच्या भितीने ग्राहक येत नाहीत़ त्यामुळे हॉटेल चालकांनी स्वच्छतेला महत्व दिले आहे़ त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी स्वयंपाकी पासून ते वेटरपर्यंत सर्वांना मास्क, सॅनिटायझर, खुर्च्या टेबल नियमित सॅनिटाईज करणे, ग्राहकांना सॅनिटायझर देणे, यासारखी काळजी हॉटेल चालकांकडून घेतली जात आहे़

अण्णा नवथर । अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील बार, रेस्टॉरंटस्, हॉटेल पुन्हा सुरू झाले खरे, पण कोरोनाच्या भितीने कुणीही तिकडे फिरकायला तयार नाही़ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल चालकांनी अनेक योजना आणल्या आहेत़ परंतु, कोरोनापुढे त्या फिक्या पडत आहेत. सध्या फक्त बार रेस्टॉरंटस् आणि नॉनव्हेज हॉटेलमध्येच गर्दी होताना दिसत आहे़ उर्वरित शुध्द शाकाहारी हॉटेलांमध्ये पहिल्या दिवशीही शुकशुकाटच होता.

नॉनव्हेज हॉटेलांनी वाढविले दरकोरोनामुळे प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी नॉनव्हेज खाण्याकडे नागरिकांचा कल आहे़ हे प्रमाण वाढल्यामुळे हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये बदल झाला असून, दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे़ल्या मार्च महिन्यापासून रेस्टारंट, बार, फुडपार्क, व्हेज, नॉनव्हेज हॉटेल, चहाच्या टपºया, कॅन्टीन बंद होते़  राज्य शासनाने हॉटेल सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला़ परंतु, हॉटेलच्या वेळांबाबत स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कुठलाही आदेश जारी करण्यात आलेला नाही़ त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये हॉटेलच्या वेळांबाबत संभ्रम आहे़ काही महिन्यानंतर हॉटेल सुरू झाले असले तरी पूर्वीप्रमाणे ग्राहक हॉटेलमध्ये गर्दी करताना दिसत नाही़ कोरोनाच्या भितीमुळे सहकुटुंब हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याचे कुणी धाडस करत नाही़ रेस्टॉरंट , बार आणि नॉनव्हेजमध्ये मात्र ग्राहकांची गर्दी होताना दिसते आहे़ पहिल्या दिवशीही अशा हॉटेलमध्ये काहीप्रमाणात ग्राहक होते़ परंतु, शुध्द शाकाहारी हॉटेलमध्ये मात्र शुकशुकाट होता़ 

घेतली जाणारी दक्षता : कोरोनाच्या भितीने ग्राहक येत नाहीत़ त्यामुळे हॉटेल चालकांनी स्वच्छतेला महत्व दिले आहे़ त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी स्वयंपाकी पासून ते वेटरपर्यंत सर्वांना मास्क, सॅनिटायझर, खुर्च्या टेबल नियमित सॅनिटाईज करणे, ग्राहकांना सॅनिटायझर देणे, यासारखी काळजी हॉटेल चालकांकडून घेतली जात आहे़

स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली बंधनेस्थानिक जिल्हा प्रशासनाने ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे़ ही परवानगी देताना शारीरिक अंतर ठेवून व स्वच्छतेच्या उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे़ तसेच याबाबत पर्यटन विभागाकडून स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे़ परंतु, तसा आदेश अद्याप जारी करण्यात आलेला नाही़

कामगारांचीशोधाशोध सुरूचहॉटेलमध्ये काम करणारे स्वयंपाकी, वेटर हे परराज्यातील असतात़ लॉकडाऊनमध्ये कामगार आपल्या गावी निघून गेले़ ते सध्या परत येत आहेत़ परंतु, काहीजण येण्यास तयार नाहीत़ त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना कामगारांचा शोध घ्यावा लागत आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरhotelहॉटेल