शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा; गहू, कांद्याचे नुकसान, वीजपुरवठा पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 13:40 IST

श्रीरामपूर शहर व तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेला गहू व कांदा पिकांना पावसाचा फटका बसला. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला व फळ पिकांचे उत्पादन यापूर्वीच वाया गेले होते. रब्बीतील पिकेही अवकाळी पावसामुळे हातची जाण्याची शक्यता आहे.

श्रीरामपूर : शहर व तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेला गहू व कांदा पिकांना पावसाचा फटका बसला. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला व फळ पिकांचे उत्पादन यापूर्वीच वाया गेले होते. रब्बीतील पिकेही अवकाळी पावसामुळे हातची जाण्याची शक्यता आहे.बुधवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत कोसळला. शहरासह तालुक्यातील बेलापूर, उक्कलगाव, कारेगाव, वडाळा महादेव, खैरी निमगाव, उंदिरगाव, टाकळीभान यासह विविध भागांत जोरदार पाऊस पडला. अनेक गावात एक ते दीड इंच पाऊस झाल्याची माहिती मिळाली. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा ही पिके काढणीला आली आहेत. हार्वेस्टिंग मशीन व मजुरांच्या सहाय्याने गव्हाची काढणी सुरू आहे. मात्र काल झालेल्या या पावसामुळे गव्हाचे उत्पादन वाया गेले आहे. पावसाबरोबर झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी गहू जमीनदोस्त झाला. त्याची सोंगणी करणे कठीण झाले आहे. शेतात काढणी करून जमा केलेला कांदा पावसामुळे भिजला. हा कांदा आता लवकर खराब होणार आहे. मात्र बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कांदा विक्री होऊ शकणार नाही. परिणामी उत्पन्न वाया जाण्याची भीती आहे. महसूल प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. मात्र संचारबंदीमुळे त्यास अडचणी येणार आहेत.दरम्यान, वादळामुळे वीज वाहक खांब अनेक ठिकाणी कोलमडून पडले. बाभळेश्वर येथील वीज उपकेंद्रातून येणाºया वाहिनीला झालेल्या नुकसानीमुळे श्रीरामपूर शहराचा वीज पुरवठा बुधवारी रात्रीपासून बंद झाला आहे. तालुक्यातील अनेक गावे अंधारात होती. महावितरण विभागाचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले असले तरी गुरुवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. पाणीपुरवठ्याला त्यामुळे अडचणी आल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र