शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात दरोडा; पाच लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 15:26 IST

बोरावके महाविद्यालयाशेजारी राहणाºया ए.पी.शाह यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला.

ठळक मुद्देदीड तास धुमाकूळ महिला व पहारेकऱ्यांना बांधून टाकले

श्रीरामपूर (जि.अहमदनगर): येथील बोरावके महाविद्यालयाशेजारी राहणाºया ए.पी.शाह यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या दरोड्यात घरातील महिला व पहारेकºयाच्या तोंडात बोळे कोंबून त्यांना बांधून टाकून सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला.स्वामी विवेकानंद गृहनिर्माण संस्थेत ए.पी.शाह यांचा बंगला आहे. शुक्रवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान दर्शनी भागाच्या दरवाजाचा कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून अज्ञात ५ चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. शाह हे बाहेरगावी गेलेले होते. त्यांच्या पत्नी भारती, नातू व सून झोपलेल्या होत्या. घराबाहेर झोपलेला पहारेकरी भागवत चव्हाण (रा.गोंधवणी, ता.श्रीरामपूर) याच्या तोंडात बोळा कोंबत दरोडेखोरांनी त्यास बांधून ठेवले. घरात प्रवेश करताच आवाजामुळे भारती या जाग्या झाल्या. दरोडेखोरांनी महिलांचीही तीच गत केली. कपाटातील सोने चांदीच्या दागिने व रोख रकमेसह सुमारे ५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.पहारेकरी चव्हाण यांनी दरोडेखोर हे चार ते पाच जण असल्याचे सांगितले. आरडाओरडा करू नये म्हणून दोघांनी धाक दाखविला. घरातील कपाटाची व सामानाची उचकापाचक केली. कपाटामधील सोन्याचे सुमारे १५-२० तोळे दागिने, रोख रक्कम व चांदीचे दागिने असा सुमारे ५ लाखाचा ऐवज लुटला. यापेक्षाही अधिक ऐवज चोरीस गेला असण्याची शक्यता आहे. अशोक शाह आल्यानंतरच चोरीचा तपशील स्पष्ट होणार आहे. एक ते दीड तास घरात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू होता. शहर पोल्सििांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.श्वानपथकाव्दारे तपासदरोड्याच्या तपासासाठी नगरहून श्वानपथक व ठसेतज्ज्ञ तातडीने आले. श्वानाने प्रवरा कालव्यापर्यंत माग काढला. तेथून दरोडेखोर पसार झाल्याचा अंदाज आहे. भारती शाह यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात ४-५ दरोडेखोरांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर