शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपाद छिंदम नगर जिल्ह्यातून तडीपार, छिंदमने दिली २५ जणांविरोधात फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 15:02 IST

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पोलीस प्रशासनाने पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पोलीस प्रशासनाने पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. छिंदमच्या तडीपारीचा सोमवारी आदेश काढण्यात आला असून, १६ एप्रिलपर्यंत त्याला जिल्हाबंदी करण्यात आली आहे.छिंदमला राज्यातून तडीपार करण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमींच्यावतीने मंगळवारी (दि़३) शहरातून शिवसन्मान मोर्चा काढण्यात येणार आहे. छिंदम या विषयावरून शहरात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी छिंदमला पोलीस प्रशासनाने १५ दिवसांसासठी जिल्हा बंदी केली आहे.दरम्यान छिंदम याने १६ फेबु्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची अ‍ॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छिंदम याचे दिल्ली गेट परिसरातील कार्यालय व त्याच्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची तोडफोड केली होती. या तोडफोडप्रकरणी छिंदम याने रविवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलीसांनी राजेंद्र नारायण दांगट, योगेश देशमुख, स्वप्निल दगडे, गोरख दळवी, भावड्या अनभुले, चेतन शेलार, विरेश तवले, रोहित गुंजाळ, धनंजय लोकरे, बाबासाहेब रोहकले, धनवान दिघे, हरिष भांबरे, गिरीष भांबरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.छिंदम याने दाखल केलीली फिर्याद व मंगळवारी त्याच्या तडीपारीच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने छिंदमला जिल्हा बंदी केली असून, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुरेश सपकाळे यांनी तडीपारीबाबत छिंदम याला नोटीस बाजवली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShripad Chindamश्रीपाद छिंदम