शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्याच्या विजय पवारने गाजविले खेलो इंडियाच्या कुस्तीचे मैदान, ब्राँझ पदकाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:28 IST

श्रीगोंदा (जि.अहमदनगर): भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या खेलो इंडीया १७ ते २३ वयोगटातील ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी विजय वसंत पवार याने ८७ किलो वजन गटात बाँझ पदक पटकविले. त्यामुळे खेलो इंडीया स्पर्धेत यंदा श्रीगोंदा तालुक्याला तीन पदके मिळाली आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा (जि.अहमदनगर): भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या खेलो इंडीया १७ ते २३ वयोगटातील ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी विजय वसंत पवार याने ८७ किलो वजन गटात बाँझ पदक पटकविले. त्यामुळे खेलो इंडीया स्पर्धेत यंदा श्रीगोंदा तालुक्याला तीन पदके मिळाली आहेत. विजय पवार हा येळपणे येथील सेवानिवृत्त मेजर वसंत पवार यांचा मुलगा आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. पण पवार परिवाराच्या कुस्ती नसानसात भिनली आहे. चुलते बाळासाहेब पवार व बबनराव डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेतले आणि शालेय महाविद्यालयीन जीवनात कुस्तीची अनेक मैदाने गाजविली. चुलते बाळासाहेब पवार याला खेळायची आवड व इच्छाशक्तीच्या बळावर तो खेलो इंडीयाच्या मैदानात यशस्वी झाला आहे.  खेलो इंडीया महिला कुस्ती स्पर्धेत भाग्यश्री फंड, सोनाली मंडलिक यांनी सुवर्ण पदक तर गणेश बायकर याने वेटलिंफ्टीगमध्ये बॉझ पदक पटकविले. जिद्दी खेळाडूंच्या कामगिरीने क्रीडा क्षेत्रात श्रीगोंद्याचे नाव उंचावत चालले आहे. येत्या चार वर्षात श्रीगोंद्यातील खेळाडू आॅलपिंक स्पधेर्चे दार उघडणार ही त्याची निशाणी आहे. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक सतिश चोरमले यांनी विजय पवारच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयास खेलो इंडीया कुस्ती स्पर्धेत बॉझ पदक मिळवून दिल्याबद्दल  विजय पवार याचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे प्राचार्य एकनाथराव खांदवे यांनी अभिनंदन केले आहे.